उद्योजक, नागरिकांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण करणार- पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचा विश्‍वास

पुणे – औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकामध्ये विश्‍वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. औद्योगिक वसाहतील खंडणीखोरी, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. पुणे जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांमध्ये विश्‍वासाचे सुरक्षिततेची भावना निर्माण करू, असा विश्‍वास नवनियुक्त ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सोमवारी व्यक्‍त केला. ते पत्रकारांशी बोलत होते.

सुवेझ हक यांची बदली करण्याचे आदेश शुक्रवारी गृहविभागाने दिले. त्यांच्याजागी सातारा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची नेमणूक करण्यात आली. पाटील यांनी हक यांच्याकडून अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयाची पाहणी केली. त्यावेळी पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांची पाहणी करणार आहोत. तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहे. नागरिकांमध्ये विश्‍वासाचे वातावरण निर्माण करणे हे पोलिसांचे काम आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत गुंडगिरी, खंडणीखोरीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)