उद्योजकांच्या प्रश्‍नावर लवकरच मुंबईत बैठक

पिंपरी – पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, रांजणगाव या औद्योजिक परिसरातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याबाबत पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या शिष्टमंडळाने उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी, उद्योगाशी संबंधित सर्व खात्याचे मंत्री व अधिकारी यांची लवकरच मुंबई येथे बैठक घेऊन उद्योग क्षेत्राच्या सर्व समस्या व मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्‍वासन देसाई यांनी दिले.

उद्योगमंत्री देसाई एका कार्यक्रमानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. यावेळी, शिष्टमंडळाने समस्याबाबत अनेक विषयावर चर्चा केली. संघटनेचे सचिव जयंत कड, उपाध्यक्ष संजय जगताप, उपाध्यक्ष विनोद नाणेजर, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, संचालक विजय खळदकर, नितीन बंनकर, संजय आहेर, शिवाजी साखरे, संजय सातव, नवनाथ वायाळ, हर्षल थोरवे, प्रवीण लोंढे, स्वीकृत संचालक प्रमोद राणे, दत्तात्रय दिवटे, भारत नरवडे, अतुल इनामदार, सुनील शिंदे, सचिन आदक, अशोक अगरवाल, सुरेश जपे, सागर शिंदे, निस्सार सुतार, चांगदेव कोलते, विजय भिलवडे, प्रभाकर धनोकार, अशोक पाटील, प्रदीप गायकवाड, मोहिनी जगताप आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बेलसरे म्हणाले,””पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील वीज वाहक यंत्रणा तीस ते चाळीस वर्षापूर्वींची असल्याने सतत वीज पुरवठा खंडित होतो. यासाठी, परिसरातील फिडर, फिडर पिलर, विद्युत रोहित्र, सब स्टेशन अद्यावत करण्याची गरज आहे. एमआयडीसी परिसरात भुयारी गटार, मैला शुद्धीकरण प्रकल्प राबवण्यासाठी गरज आहे.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसीने उद्योग वा इतर सामाजिक कामासाठी पिंपरी महापालिकेस काही भूखंड दिले आहेत. परंतु, पालिकेने भूखंड विकसित न केल्याने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहेत. यामुळे, ते भूखंड पालिकेकडून परत घेऊन लघु उद्योगांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. उद्योग धंद्यांना चालना मिळण्यासाठी चाकण येथे विमानतळ होणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवड मधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे 80 टक्के काम स्थनिकांना मिळाल्यास अनेक रोजगार उपलब्ध होतील. सध्या अस्तित्वात असलेल्या माथाडी कामगार कायद्यामधून उद्योग क्षेत्राला वगळणे आवश्‍यक आहे. तसेच, उद्योग मंत्रालयाकडून एसआरए प्रकल्प पिंपरी चिंचवड, भोसरी एमआयडीसीत राबवण्याचे घोषित केले होते. मात्र, हा प्रकल्प विद्यानगर, रामनगर, अजंठानगर या मोठ्या झोपडपट्टी मध्ये राबवून उर्वरित मोकळ्या झालेल्या जागा लघु उद्योगांना वितरीत करणे आवश्‍यक असल्याचे,” त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)