उद्योगांशी सुसंगत अभ्यासक्रम हवेत 

पणजी: उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत गोवा राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचा पदवीदान सोहळा पार पडला. उच्च शिक्षण हे कालानुरूप असले पाहिजे. लाखो विद्यार्थ्यांना कोणत्याही कौशल्याशिवाय पदवी देणे थांबले पाहिजे. विद्यापीठांनी उद्योगांशी सुसंगत अभ्यासक्रम आणि शिक्षणपद्धती अनुसरण्याची गरज असल्याचे नायडू म्हणाले.
विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी कोणत्याही शॉर्टकट्‌सचा वापर करू नये, असा सल्ला उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांनी धैर्य, प्रामाणिकपणा, सहानुभूती, संयम आणि आत्मविश्‍वास या गुणांच्या आधारावर आपली स्वप्ने पूर्ण करावी, असे उपराष्ट्रपती म्हणाले. योग्य मार्गाने वाटचाल केल्यास काहीही अशक्‍य नाही, असे ते म्हणाले.
अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी जनसामान्यांच्या आवश्‍यकता लक्षात घेऊन अगदी माफक दरात उपलब्ध होईल, असे संशोधन करावे. विशेषतः आरोग्य आणि शिक्षणक्षेत्रात संशोधनासाठी मोठा वाव असल्याचं उपराष्ट्रपती म्हणाले. भारतात 2030 पर्यंत उच्च मध्यमवर्गीयांची संख्या मोठ्या प्रमाणात असेल, त्यामुळे विविध क्षेत्रात काम करण्याच्या संधी कुशल युवकांना मिळतील. याप्रसंगी बोलताना उपराष्ट्रपतींनी शिक्षकांना सांगितले की, विद्यार्थी स्वयंरोजगार प्राप्त करतील, याकडे त्यांनी पाहावे. सरकारचा स्कील इंडिया कार्यक्रम त्याच दिशेने आहग असे ते म्हणाले.
नवभारत निर्माण करण्यासाठी या दुष्प्रवृत्तींना हद्दपार केले पाहिजे. शिक्षणाचे महत्त्व विशद करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, शिक्षण केवळ रोजगारासाठी नाही तर शिक्षणामुळे सबलीकरण प्राप्त होऊन विद्यार्थ्यांना जागतिक नागरिक बनण्याच्या दृष्टीने त्यांच्या ज्ञानकक्षा रुंदावतात, असे ते म्हणाले. गोवा राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने याप्रसंगी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना मानद डॉक्‍टरेट पदवी प्रदान केली. मुख्यमंत्र्यांच्या वतीने प्रो. गोपाल मुगेराया यांनी पदवी स्वीकारली. पदवीदान सोहळ्यात पाच विद्यार्थ्यांना डॉक्‍टरेट देण्यात आली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)