उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिध्देश्वर महाराजांना अभिषेक

चाकण- शिवसेना खेड तालुक्‍याच्या वतीने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून राजगुरुनगरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराजांना अभिषेक करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा प्रमुख राम गावडे, जिल्हा उपप्रमुख शिवाजी वर्पे, जिल्हा समन्वयक डॉ. गणेश सांडभोर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका विजया शिंदे, शिवव्यख्याते योगेश गावडे, खेड तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, महिला आघाडीच्या खेड तालुकाप्रमुख नंदा कड, शेतकरी सेनेचे एल. बी. तनपूरे, दिलीप तापकीर, विभागप्रमुख अर्चना सांडभोर, उद्योजक तुषार सांडभोर, शाखाप्रमुख संदिप इंगळे, कैलास गोपाळे, सुनिल थोरवे, अशोक वांळुज, उपसरपंच गोरख सुकाळे, विद्यार्थी सेनेचे श्रीनाथ लांडे, मच्छिंद्र थिगळे, बाजीराव बचुडे आदी उपस्थित होते. तसेच शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख नंदा कड यांच्यावतीने राजगुरुनगर येथील वनवाशी कल्याण अनाथआश्रमात धान्य वाटप करण्यात आले. यावेळी वस्तीगृहातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)