उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस ठरला खास; राहुल गांधींकडूनही शुभेच्छा

अनेकांच्या भुवया उंचावल्या
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा यावेळचा वाढदिवस राजकीयदृष्ट्या खास ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मात्र, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना दिलेल्या शुभेच्छा राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावणाऱ्या ठरल्या.

मोदी, राहुल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरून उद्धव यांना शुभेच्छा दिल्या. ब्रिक्‍स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असतानाही मोदी यांनी आवर्जून उद्धव यांचे अभीष्टचिंतन केले. अनेक वर्षांपासूनचे मित्र असणाऱ्या भाजप आणि शिवसेना या पक्षांमधील संबंध अलीकडच्या काळात ताणले गेले आहेत. त्यामुळे मोदींनी दिलेल्या शुभेच्छांना महत्व आहे. मात्र, राहुल यांनी दिलेल्या शुभेच्छांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. राहुल यांनी केलेल्या अभीष्टचिंतनाबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उद्धव यांनी देशातून आणि देशाबाहेरूनही शुभेच्छा मिळाल्या. यावेळी राहुल यांनी प्रथमच जाहीररित्या त्यांचे अभीष्टचिंतन केले, असे ते म्हणाले. लोकसभेत काही दिवसांपूर्वी मोदी सरकारच्या विरोधातील अविश्‍वास ठरावावर चर्चा झाली. त्यावेळी राहुल यांनी मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. सरकारमधील घटक असूनही राहुल यांच्या त्या भाषणावर शिवसेनेकडून स्तुतिसुमने उधळण्यात आली. आता राहुल यांनी उद्धव यांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

दरम्यान, व्यक्तिगत संबंध निर्माण करण्यासाठी राहुल राजकीय मतभेदांपलिकडे जाऊ शकतात हेच त्यांच्या कृतीतून सिद्ध झाल्याचे कॉंग्रेसच्या सुत्रांनी म्हटले. तर राहुल यांनी दुसऱ्या पक्षाच्या प्रमुखाचे अभीष्टचिंतन केले. त्यातून वेगळा राजकीय अर्थ काढला जाऊ नये, असे कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)