कराड, दि. 12 (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी सुरक्षा दल, दलित विकास आघाडी, कामगार सुरक्षा दल व महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना, राष्ट्रीय अपंग विकास महासंघ या संस्थांच्या पदाधिका-यांनी राष्ट्रवादी, कॉंग्रेस व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांना पाठिंबा जाहीर केला.
उदयनराजे भोसले कराड संपर्क दौ-यावर असताना या संस्था, संघटनांच्या पदाधिक-यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला. राज्य झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय भिसे, तालुकाध्यक्ष शरद केंगार, लक्ष्मण मोटे, आबासाहेब यादव, शिवाजी देवकुळे, नितीन तुपे,अरूण सुतार, सुरज शेख, मुस्तापा रायचूर, रंगाप्पा नाटेकर, मस्तान अत्तार, राजू कोळी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे आगार अध्यक्ष आनंदा मोहिते, सचिव धनंजय थोरात व पदाधिका-यांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे आकाश पवार, समीर मुजावर व पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला.