उदयनराजेंच्या विरोधात भाजपतर्फे नरेंद्र पाटील?

तगडी रसद पुरवण्याच्या तयारीने साताऱ्यात रंगतदार लढतीची अपेक्षा

सातारा – शिवसेना आणि भाजप युती झाल्यानंतर भाजपने आपली राजकीय समीकरणे तीनशे साठ अंशामध्ये बदलली आहेत.आता आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाला कोणत्या जागेवर उमेदवारी द्यायची याची लगबग सुरु आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या युतीच्या प्रेमळ मधुचंद्रात सातारा वाट्याला आल्यास खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात माथाडी नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे . पाटीलकीचा चमत्कार होणार का ? यासाठी भाजपने तगडी रसद पुरवण्याची तयारी दर्शवल्याने साताऱ्यात रंगतदार लढतीची अपेक्षा वाढली आहे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे सातारा भाजपकडे वळवण्यात इच्छुक असून असे घडल्यास उदयनराजेंना टककर देण्यासाठी आता नरेंद्र पाटील यांच्या नावाला बळकटी मिळू लागली आहे.

एकीकडे मुख्यमंत्र्यांनी भुईजचा कॉंग्रेसचा सोज्वळ चेहरा मदन भोसले व माथाडीच नेते नरेंद्र पाटील हे दोन्ही एकके आपल्या मर्जीत आणले आहे . मदन भोसले किंवा नरेंद्र पाटील या चर्चेत पाटीलकीला पसंती दिली जात आहे . हक्काची माथाडी व्होट बॅंक ही सातारा ते मुंबई पसरलेली आहे . त्यामुळेच सेनेच्या शंभूराजे देसाईना टक्कर देण्यासाठी नरेंद्र पाटील यांना पाटण मध्ये आणण्यात आले . स्वतः पाटील पाटण विधानसभा मतदार संघाला पसंती दिली होती . मात्र मुख्यमंत्र्यांनी खुद्द शंभूराजे देसाई यांनाच जवळ करत भाजपकडून मोठी ऑफर दिली होती . मात्र आता सेना भाजपच्या युतीनंतर राजकीय संदर्भ बदलले असून नरेंद्र पाटील यांच्या खासदारकीच्या शिडाला राजकीय हवा मिळू लागली आहे . मुंबई ते सातारा या पट्टयात गुरुवारी फक्त नरेंद्र पाटील यांच्याच नावाची चर्चा होती . त.नरेंद्र पाटील याआधी विधानपरिषदेचे आमदार होते.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सातारा मतदारसंघ हा रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दिला होता. परंतु यंदाच्या निवडणुकीत ही जागा भाजपकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता रामदास आठवले काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

नरेंद्र पाटील माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र आहेत. सातारा, वाई, कोरेगाव, पाटण इथे माथाडी मतदारांवर नरेंद्र पाटील यांची पकड आहे. मराठा मोर्चे निघाला होते, त्यात सातारा पट्ट्यातील लोकांचा सर्वाधिक समावेश होता. त्यामुळे ही मतं नरेंद्र पाटील यांना मिळतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजेंविरोधात भाजपकडून नरेंद्र पाटील रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे.राज्य सरकारने यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकासमंडळाचं अध्यक्षपद दिल्यानंतर नरेंद्र पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम ठोकला होता.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.