उत्सुकता भविष्याची…(28 मे ते 3 जून 2018 पर्यंतचे ग्रहमान)

अनिता केळकर 

मेषेत हर्षल, वृषभेत बुध, रवी, मिथुनेत शुक्र, कर्केत राहू, तुळेत गुरू वक्री, धनूमध्ये शनी व प्लुटो वक्री, मकरेत मंगळ व केतू तर कुंभेत नेप्चून आहे. केलेल्या कामात यश मिळाल्याने आनंद वाटेल. महत्त्वाच्या कामांमध्ये तुमचा पुढाकार राहील. पैशाची चिंता मिटेल. समाधानी रहाल.

मेष : पैशांची चिंता मिटेल
कामकाजात यश मिळेल. व्यवसायात जादा आत्मविश्‍वास बाळगू नये. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्यावीत. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत कामाचा आनंद मिळेल. नोकरदार महिलांना वरिष्ठांच्या मर्जीत राहता येईल. त्यामुळे जादा सवलती मिळतील. आवडत्या व्यक्तिशी गाठीभेटी होतील. महिलांना वैवाहिक सुख उत्तम लाभेल. सुवार्ता कळेल. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान.
शुभ दिनांक : 28, 31, 1, 2, 3

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वृषभ : नोकरीत नवीन संधी
ओळखी व मध्यस्थीतून कामात प्रगती होईल. नवीन कामे मिळतील. व्यवसायात हातातील कामांना विलंब होण्याची शक्‍यता तरी नाराज होऊ नका. चिकाटीनेच यश मिळेल. नोकरीत नवीन संधी चालून येतील. प्रवासयोग, जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिलांना मुलांची शैक्षणिक प्रगती कळेल. स्वास्थ्याबाबत मात्र थोडे अधिक दक्ष रहावे लागेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.
शुभ दिनांक : 29, 3, 3

मिथुन : चांगली बातमी कळेल
गुरु, रवीची उत्तम साथ मिळेल. एखादी चांगली बातमी कानावर येईल. व्यवसाय व भागिदारीतून विशेष लाभ होईल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत मनाप्रमाणे कामे होतील. उत्तम बदल होतील. मानसन्मान मिळेल. महिलांना यशप्राप्तीने मानसिक समाधान मिळेल. नोकरदार महिलांनी वादविवाद वाढू देऊ नयेत. तरुणांना विवाहयोग येतील. नवपरिणीतांना भाग्योदय.
शुभ दिनांक : 28, 31, 1, 2

कर्क : अचानक धनप्राप्ती
व्यवसायात अडथळे आले तरी कामाचा वेग कमी करू नका. खरेदी-विक्रीतून लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत कामानिमित्ताने प्रवास घडेल. अचानक धनप्राप्तीचे योग येतील. नवीन ओळखीतून फायदा होईल. महिलांना सुवार्ता कळेल. घरात वातावरण छान राहील. मुलांची प्रगती व प्रवृत्तीबाबतीतील चिंता मिटेल. राहत्या घराचे प्रश्‍न मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात पूरक ग्रहमान.
शुभ दिनांक : 28, 29, 30, 3

सिंह : नवीन कामे मिळतील
व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी योग्य ते बदल कराल. यशाची मदार तुमचेवर राहील. नवीन कामे मिळतील. नोकरदार व्यक्तींनी सहकाऱ्यांवर विसंबून न राहणेच चांगले. सामाजिक, धार्मिक कार्यात मात्र प्रगती होईल. प्रतिष्ठा वाढेल. महिलांनी कामात लवचिक धोरण ठेवले तर विशेष फायदा होईल. मित्रमंडळी आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे.
शुभ दिनांक : 28, 29, 30, 31, 1, 2

कन्या : तणाव कमी होईल
पैशाच्या व्यवहारात चोखंदळ रहाल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल. जुनी येणी वसूल होतील. देणी देता येतील. त्यामुळे तणाव कमी होईल. नोकरीत थोडी कळ सोसलीत तर परिस्थिथीत बदल होईल. मनाप्रमाणे कामे होतील ही अपेक्षा ठेवू नका. महिलांनी रागावर नियंत्रण ठेवावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. कौटुंबिक उत्कर्ष होईल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.
शुभ दिनांक : 28, 29, 30, 1, 2, 3

तूळ : तणाव कमी होईल
पैशाच्या व्यवहारात चोखंदळ रहाल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल. जुनी येणी वसूल होतील. देणी देता येतील. त्यामुळे तणाव कमी होईल. नोकरीत थोडी कळ सोसलीत तर परिस्थिथीत बदल होईल. मनाप्रमाणे कामे होतील ही अपेक्षा ठेवू नका. महिलांनी रागावर नियंत्रण ठेवावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. कौटुंबिक उत्कर्ष होईल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.
शुभ दिनांक : 28, 29, 30, 1, 2, 3

वृश्चिक : धनलाभाची शक्‍यता
व्यवसायात हितशत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवाल. त्याप्रमाणे कामात बदल करून पुढचे बेत आखाल. पूर्वी केलेल्या कामातून आता विशेष लाभ होईल. नोकरीत उत्तम बदल घडून येईल. धनलाभाची शक्‍यता. हातून सामाजिक व धार्मिक कार्ये पार पडतील. महिलांनी वाद व भांडणे सामंजस्याने सोडवावीत. विनाकारण झालेले गैरसमज दूर करावेत. छोट्याशा सहलीचे आयोजन कुटुंबासमवेत करावे.
शुभ दिनांक : 29, 30, 31, 1, 2, 3

धनु : नवीन वास्तूचे योग
कामाचा वेग वाढेल. यशाची कमान उंचावेल. पैशाची स्थिती उत्तम राहील. जुनी येणी वसूल होतील. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवली जाईल. नवीन वास्तूत रहायला जाण्याचे योग येतील. महिलांना घरगुती कामातून यश मिळेल. प्रियजनांच्या जीवनातील संस्मरणीय शुभघटना साजरे कराल.
शुभ दिनांक : 28, 31, 1, 2, 3

मकर : आर्थिक लाभ होईल
व्यवसायात उलाढाल वाढेल. महत्त्वाची कामे गती घेतील. आर्थिक लाभ होईल. हितचिंतकांची मदत होऊन नवीन कामे मिळतील. नोकरीत कामाचे बेत गुप्त ठेवा. सहकाऱ्यांकडून कुठलीही अपेक्षा करू नका. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. कलाकार, खेळाडू, राजकारणी व्यक्तींना उत्तम यश मिळेल. भाग्योदय होईल. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. विद्यार्थ्यांचे मन एकाग्र होईल.
शुभ दिनांक : 28, 29, 30, 3

कुंभ : नोकरीत बढती मिळेल
रवी, मंगळ, बुध इ. सारखे महत्त्वाचे ग्रह अनुकूल आहेत. व्यवसायात आधुनिकीकरण करून विस्ताराचे बेत यशस्वी होतील. अपेक्षित पत्रव्यवहार व परदेशगमनाच्या कामांना चालना मिळेल. विरोधकांच्या कारवायांचा अचूक अंदाज येईल. नोकरीत बढती मिळेल. बेकारांना नोकरी मिळेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिलांना मानसिक व शारीरिक आरोग्य जपावे लागेल. दगदग धावपळही कमी करावी.
शुभ दिनांक : 28, 29, 30, 31, 1, 2

मीन : यशप्राप्ती होईल
नशिबावर विसंबून न राहता प्रयत्नावर विश्‍वास ठेवावा यशप्राप्ती होईल. व्यवसायात अशक्‍य वाटणाऱ्या कामात उत्तम प्रगती होईल. पैशाची स्थिती उत्तम राहील. नोकरीत कामात बिनचूक राहणे लाभदायक ठरेल. कुसंगत टाळा. आजचे काम आजच पूर्ण करा. महिलांनी सामोपचाराने वागून कामे मार्गी लावावीत. आवडत्या छंदातून व उपक्रमातून प्रसिद्धी मिळेल. संततीबाबत शुभ बातमी कळेल. तरुणांचे विवाह जमतील.
शुभ दिनांक : 29, 30, 31, 1, 2, 3

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)