उत्सुकता भविष्याची…(23 ते 29 एप्रिल 2018 पर्यंतचे ग्रहमान)

अनिता केळकर 

लग्नी रवी, हर्षल, धनस्थानात शुक्र, चतुर्थात राहू, सप्तमात गुरू वक्री, भाग्यात शनी वक्री, प्लुटो वक्री व मंगळ, मकरेत केतू, कुंभेत नेप्चून, तर मीनेत बुध आहे. कामानिमित्ताने बरीच धावपळ, दगदग होईल. कामाचा कंटाळा आला तरी नेटाने कामे करत रहा. पैशाची चिंता मिटेल. प्रकृतीची उत्तम साथ मिळेल.

मेष : कामात थोडा धीर धरा
या सप्ताहात केलेल्या कामाचे श्रेय आणि मोबदला मिळवण्यासाठी बरीच धावपळ करावी लागेल. कामात थोडी निराशा येईल. पण काम चालूच ठेवाल. व्यवसायात कामाचा वेग उत्तम राहील. सहकारी व हितचिंतकांची कामात मदत होईल. हौसेने एखादे काम हाती घ्याल त्यात थोडा त्रास होईल. नोकरीत अतिउत्साहाच्या भरात कोणतेही आश्‍वासन देऊ नका ते पूर्ण करावे लागेल. कामात थोडा धीर धरा.
शुभ दिनांक : 23,24,25,26,29

वृषभ : भांडवलाची तरतूद होईल
स्वकृर्तुत्वावर विश्‍वास ठेवून कार्य करीत रहा. यश येईल. व्यवसायात पूर्वी केलेल्या कष्टाचे चांगले फळ मिळेल. कामाच्यावेळी काम करून इतर वेळी आराम कराल. भांडवलाची तरतूद झाल्याने प्रगतीपथावर रहाल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी मदत करतील. वरिष्ठ कामात न मागता सवलत देतील. परदेश व्यवहारांना चालना मिळेल. महिलांना सभोवतालच्या व्यक्तींचे अंदाज येतील.
शुभ दिनांक :23,24,25,26,27, 28

मिथुन : आवडीचे काम मिळेल
काळानुरुप बदल कराल. व्यवसायात योग्य व्यक्तींची निवड योग्य कामासाठी करून फायदा मिळवाल. तुमच्या मनातील कल्पना प्रत्यक्षात साकार करण्यास उत्तम काळ आहे. काही कारणाने लांबलेली कामे गती घेतील. हातातील कामे पूर्ण होतील. नोकरीत आश्‍वासनं देण्यापूर्वी तुमच्याकडून काय अपेक्षा आहे, याचा अचूक अंदाज घ्या. आवडीचे काम मिळेल. त्यामुळे मानसिक समाधान लाभेल. चांगली बातमी कळेल.
शुभ दिनांक :23,24,25,26,28.29

कर्क : ओळखीचा उपयोग होईल
दीर्घकाळानंतर चांगले ग्रहमान लाभले आहे. त्याचा फायदा घ्या. व्यवसायात ठोस पावले उचलून कृती कराल. मनावरचे दडपण दूर होईल. अपेक्षित पैसे हातात मिळाल्याने योजना साकार होतील. परदेश व्यवहाराची नवीन संधी चालून येईल. नोकरीत उत्साहवर्धक वातावरण लाभेल. ओळखीचा उपयोग होईल. घरात लांबलेले कार्य निश्‍चित ठरेल. परेदशगमनाची संधी चालून येईल. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल.
शुभ दिनांक :23,24,25,26,28.29

सिंह : वैचारिक मतभेद होतील
कामात आळस झटकून प्रगती करा. सभोतालच्या व्यक्तींचे सहकार्य खुबीने मिळवा. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी प्रसिद्धीमाध्यमांचा उपयोग कराल. भागीदाराच्या सल्ल्याशिवाय कोणतेही निर्णय घाईने घेऊ नका. नोकरीत आपले काम बरे की आपण बरे, हे धोरण उपयोगी पडेल. नवीन नोकरीच्या कामात थोडा विलंब सहन करावा लागेल. वैचारिक मतभेद होतील तरी डोके शांत ठेवा. महिलांनी दगदग कमी करावी.
शुभ दिनांक : 25,26,27,28,29

कन्या : कामात प्रगती कराल
मानसिक आनंद मिळवून देणारे ग्रहमान आहे. व्यवसायात पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ चांगल्या स्वरुपात तुम्हाला मिळेल. अडीअडचणींवर मात करून कामात प्रगती कराल. नवीन आखलेले बेत सफल होतील. आर्थिकस्थितीही सुधारेल. नोकरीत तुमच्या सूचनांचा विचार वरिष्ठ करतील. मान व प्रतिष्ठा मिळवून देतील. घरात वातावरणात चांगला बदल घडेल. मनोकामना सफल होतील. कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगाल.
शुभ दिनांक : 23,24,27,28.29

तूळ : यशाची भिस्त राहील
तुमचे प्रयत्न व कष्ट यांची योग्य सांगड घातलीत तर यश फार दूर नाही, असा अनुभव येईल. व्यवसायात शिस्त व योग्य नियोजनाने कामे होतील. मध्यस्थांवर सोपवलेल्या कामावर देखरेख ठेवा. नोकरीत हाताखालच्या व्यक्तींकडून काम कसे करून घेता यावर यशाची भिस्त राहील. वरिष्ठ कामानिमित्ताने जादा अधिकार व सवलतही देतील. घरात किरकोळ मानापमानाचे प्रसंग घडतील.
शुभ दिनांक : 23,24,25,26,29

वृश्चिक : स्वप्ने साकार होतील
आशावादी रहाल. स्वप्ने साकार होतील. व्यवसायात ध्येयाच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची संधी मिळेल. फायदा मिळवून देणारी कामे मिळाल्याने कामाचा उत्साह वाढेल. नोकरीत नवीन कामासाठी प्रयत्न करणाऱ्यांना काम मिळेल. वरिष्ठ मतलब साध्य करण्यासाठी आवळा देऊन कोहळा काढणार नाहीत, याची काळजी घ्या. घरात शुभकार्याची नांदी होईल. नातेवाईक, आप्तेष्ट, प्रियजन यांच्या भेटीचे योग येतील.
शुभ दिनांक : 23,24,25,27,28

धनु : पैशांची चिंता मिटेल
सर्व आघाड्यांवर सज्ज रहा. प्रत्येक तुमचे काम महत्त्वाचे असेल. व्यवसायात वेळेचे व पैशाचे गणित मांडल्याशिवाय सुरुवात करू नका. महत्त्वाची कामे स्वत: हाताळून इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्या. पैशाची चिंता मिटेल. कमाई मनाप्रमाणे होईल. नोकरीत गरजेनुसार कामांना अग्रक्रम राहील. मिळालेल्या सुखसुविधा उपभोगण्याकडे कल राहील. प्रवासयोग सभंवतो. तरूणांना वैवाहिक जीनवात पदार्पण करावेसे वाटेल.
शुभ दिनांक : 25, 26, 27, 28, 29

मकर : पगारवाढ होईल
मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्या. व्यवसायात कामानिमित्ताने विविध स्तरावरील व्यक्तींशी भेटीगाठी होतील. नवीन कल्पना मनात येतील. पैशाचा ओघ राहिल्याने जुनी देणी देता येतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. पगारवाढ मिळेल. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. घरात छोटा समारंभ साजरा कराल. आत्मविश्‍वास वाढेल. तरुणांना नवीन संधी आकर्षित करतील.
शुभ दिनांक : 23,24, 27, 28, 29

कुंभ : वेळ मजेत जाईल
मनाला दिलासा देणारे ग्रहमान लाभल्याने नि:श्‍वास टाकाल. व्यवसायात नेहमीच्या कामाचा तणाव असेल. तरीही तुम्ही त्याची पर्वा करणार नाही. आर्थिक स्थिती चांगली राहिल्याने अनेक बेत पूर्ण होतील. जोडधंदा असणाऱ्यांना चांगली संधी उपलब्ध होईल. वेळेचे गणित मांडून कामे उरका. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामावर खुष होतील व जादा सवलत देतील. घरात शुभ समाचार कळेल. छोटीशी ट्रिप काढाल.
शुभ दिनांक : 25, 26, 29

मीन : परदेशगमनाची संधी
ग्रहमान अनुकूल असल्याने तुमच्या प्रयत्नांना नशिबाची जोड मिळेल. मनातील अनेक बेत साकार करण्यासाठी पावले उचलाल. व्यवसायात वेळेत कामे पूर्ण केलीत तर बराच फायदा होईल. प्रतिष्ठीत व्यक्तीच्या भेटीचे योग येतील. नवीन योजनांना मुहूर्त लाभेल. नोकरीत विशिष्ठ कामासाठी परेदशगमनाची संधी मिळेल. परदेश व्यवहारांना चालना मिळेल. सुवार्ता मनाला उभारी देईल.
शुभ दिनांक : 23, 24, 27, 28


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)