उत्सुकता भविष्याची…(23 जुलै ते 29 जुलै 2018 पर्यंतचे ग्रहमान)

अनिता केळकर

लग्नी हर्षल, चतुर्थात रवी, बुध वक्री, राहू, पंचमात शुक्र, सप्तमात गुरु, भाग्यात शनी, प्लुटो वक्री, दशमात मंगळ वक्री व केतू तर लाभात नेपच्यून वक्री आहे. महत्वाया ग्रहमानाची साथ मिळेल. कामात ओळखीचा उपयोग होईल. जोडधंद्यामुळे विशेष लाभ होईल.

मेष : दगदग वाढेल
रवी मंगळ अनुकूल आहेत. व्यवसायात ओळखीचा उपयोग होईल. अनपेक्षित कामे मिळतील. नोकरीत नवीन कामामुळे दगदग धावपळ वाढेल जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिलांनी अलिप्त धोरण ठेवावे. नोकरदार महिलांना कामाचा कंटाळा आला असेल तर मित्र मैत्रिणींसमवेत छोटी सहल काढावी. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करावा.
शुभ दिनांक : 25, 26, 27, 28, 29

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वृषभ : नवीन ओळखी होतील
व्यवसायात ध्येयधोरणे ठरवाल. स्वत:ची कुवत ओळखून कामे हाती घ्या. अतिधाडस टाळा. प्रसंगी आपले मनोधैर्य खचून देवू नका. मनाविरुद्ध वागावे लागले तरी राग प्रकट करू नका. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांना आवडत्या छंदात मन रमविता येईल. घरकामातही तत्पर राहाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात पूरक ग्रहमान.
शुभ दिनांक : 23, 24, 27, 28, 29

मिथुन : मोठयांचा सल्ला घ्या
व्यवसायात आर्थिक बाबतीत फारशी हालचाल नको. महत्वाचे निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्या. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. नोकरीत तुमच्या कामामुळे तुमचे व कामाचे महत्व वरिष्ठ व सहकाऱ्यांना कळून येईल. बेकार व्यक्‍तींना अतिचिकित्सा न करता नोकरी स्वीकारावी. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.
शुभ दिनांक : 25, 26

कर्क : आर्थिक लाभ
माणसांची पारख करणे व्यवसायात महत्वाचे राहील. प्रत्येक पाऊल टाकताना विचाराने टाका. महत्वाचे निर्णय घेताना मोठयांचा सल्ला घ्या. व्यवसायात नवीन विस्ताराचे बेत मनात घोळतील. नोकरीत पैशाच्या मोहमयी वातावरणापासून दूर रहा. आर्थिक लाभ होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये.
शुभ दिनांक : 23, 24, 27, 28, 29

सिंह : व्यवसायात प्रगती
बराच काळ रेंगाळलेली कामे गती घेतील. पूर्वी केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत परदेशगमनाचे योग येतील. कामामुळे नवीन ओळखी होतील. नोकरदार महिलांना कामातील कौशल्य दाखवता येईल. मनाप्रमाणे वागता येईल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी मिळेल.
शुभ दिनांक : 23, 24, 25, 26

कन्या : सुवार्ता कळेल
कामाचे व पैशाचे योग्य नियोजन करून कामात उलाढाल वाढवाल. व्यवसायात सतर्क राहावे लागेल. कामातील बदल भविष्यात फायदा मिळवून देतील. कामात बिनचूक राहणे फायद्याचे. महिलांना पूर्वी लांबवलेल्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल.सुवार्ता कळेल.
शुभ दिनांक : 23, 24, 25, 26, 27, 28, 29

तूळ : तडजोड करा
“तेरडयाचा रंग तीन दिवस’ असे धोरण ठेवाल. ग्रहमान व वातावरणानुसार बदलत राहाल. व्यवसायात लवचिक धोरण अवलंबाल. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित कराल. नोकरीत विक्षिप्त व तऱ्हेवाईकपणा कमी करा. तत्वाला मूरड घालून तडजोड करा. महिलांना मुलांकडून चांगली बातमी कळेल. पैशाची चिंता मिटेल.
शुभ दिनांक : 23, 24, 25, 26, 27, 28, 29

वृश्‍चिक : बेत गुप्त ठेवा
तुमचे कामाचे बाबतीत घेतलेले अंदाज अचूक ठरतील. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल. नवीन घडामोडी घडतील. नोकरीत कामानिमित्ताने प्रवास घडेल. कामातील बेत गुप्त ठेवा. महिलांनी तात्विक मुद्यावरून होणारे वादविवाद टाळावेत. कलावंत,
शुभ दिनांक : 23, 24, 25, 26, 27, 28, 29

धनु : मन:शांती मिळेल
नशिबांची साथ मिळेल. व्यवसायात पुढे जाल. नवीन आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी सखोलतेने विचार कराल. नोकरीत अनपेक्षित कामे होतील. वरिष्ठ नवीन संधी देतील त्याचा फायदा उठवा. बेकारांनाही नोकरीची संधी मिळेल. महिलांनी सलोख्याचे धोरण ठेवले तर लाभ होईल. तरुणांना नवीन व्यक्‍तींचे आकर्षण वाढेल.
शुभ दिनांक : 25, 26, 27, 28, 29

मकर : कुसंगत टाळा
कर्तव्यात कसूर नको. महत्वाकांक्षा व जिद्द बाळगून अर्धवट कामे मार्गी लावाल. अवघड काळात यश मिळवाल. व्यवसायात व्यवहारी धोरण ठेवलेत तर फायदा होईल. पैशाचे व्यवहार करताना चोख रहा. हलके कान ठेवून गैरसमजुतीचे घोटाळे टाळा. महिलांनी झेपेल तेवढेच काम करावे. दगदग धावपळ कमी करावी, प्रतिष्ठा मिळेल.
शुभ दिनांक : 23, 24, 27, 28, 29

कुंभ : चांगली बातमी कळेल
स्वप्ने साकार होतील. व्यवसायात अतिउत्साहापोटी नवीन कामे स्वीकाराल. केलेल्या कामाचे कौतुक सर्वजण करतील. नोकरीत आर्थिक आवक सुधारेल. कामात बढतीचे योग. दूरच्या प्रवासाचे बेत निश्‍चित होतील. आनंद व उत्साह वाढेल. कलाकार खेळाडूंना त्यांच्या क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाला अनुकूल ग्रहमान.
शुभ दिनांक : 23, 24, 25, 26

मीन : अनावश्‍यक खर्च टाळा
नाचरेपणा कमी करून व्ववसायात लक्ष द्या. कामात उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न कराल. नवीन कामे मिळतील. नोकरीत मनाप्रमाणे कामे होतील. सहकारी व वरिष्ठांची साथ मिळेल. घरात महिलांना संततीसंदर्भात गोड बातमी कळेल. अनावश्‍यक खर्च मात्र टाळावेत. विद्यार्थ्यांनी झटून अभ्यास करावा.
शुभ दिनांक : 23, 24, 25, 26, 27, 28, 29

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)