उत्सुकता भविष्याची…(27 ऑगस्ट ते 02 सप्टेंबर 18 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे)

अनिता केळकर (लेखिका – ज्योतिषतज्ज्ञ)

अग्नी हर्षल वक्री, चतुर्मासात राहू व बुध, पंचमात रवी, सष्ठात शुक्र, सप्तमात गुरू, भाग्यात शनि व प्लुटो वक्री, दशमात मंगळ वक्री व केतू तर लाभात नेप्च्यून वक्री आहे.सदर ग्रहमान जरी साथ देणारे नसले तरी निराश न होता कार्यरत रहा. महत्वाचे निर्णय तूर्तास घेऊ नका. खर्चावर बंधन ठेवा. डोके शांत ठेऊन तब्येतीची काळजी घ्यावी.

मेष: ग्रहमान प्रतिकुल
साथीला ग्रहमान फारसे अनुकुल नाही. तरी तब्येतीची काळजी घ्या. कफ व पित्त विकारांवर वेळीच उपचार करा. व्यवसायात तूर्तास कोणतेच महत्वाचे निर्णय घेऊ नका. अनावश्‍यक खर्चावर बंधन ठेवा. नोकरदार व्यक्तींनी कोणतेही मतप्रदर्शन करू नका. कामात चोखंदळ रहावे. महिलांनी बोलताना वागतांना तारतम्य बाळगावे. वादविवाद टाळावे. शुभ दिनांक : 27,28,31,1,2.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वृषभ: दगदग, धावपळ
व्यवसायात कामांना म्हणावी तशी गती मिळणार नाही. तरी नाराज होऊ नका. खेळत्या भांडवलाची उभारणी करावी लागेल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात तुमचेकडून बरीच अपेक्षा ठेवतील. दगदग, धावपळ होईल. महिलांना घरकामात बराच वेळ घालवावा लागेल. आप्तेष्ट नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात सतर्क रहावे लागेल.
शुभ दिनांक : 27,28,29,30,2.

मिथुन: आनंददायी घटना
कामात व व्यवसायात मनाप्रमाणे प्रगती होईल. निर्णय अचूक ठरतील. पैशाची चिंता मिटेल. अनपेक्षित पैशाची ऊब सुखावह ठरेल. नोकरीत लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन हितसंबंध जोडले जातील. तरूणांचे विवाह ठरतील. घरात महिलांना नवीन खरेदीचा आनंद लुटता येईल. आनंददायी घटना मन प्रफुल्लीत करेल.
शुभ दिनांक : 27,28,29,30,31,1.

कर्क: वरकमाई करता येईल
तब्येतीची साथ उत्तम राखण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक वाटेल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यास शत्रूंच्या बारीक हालचालींवर लक्ष ठेवावे लागेल. कामातील बेत गुप्त ठेवावेत. नोकरीत नको त्या कामात बराच वेळ जाईल. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. महिलांना थोडी विश्रांतीची गरज भासेल.
शुभ दिनांक : 29,30,31,1,2.

सिंह: कामाचा उरक पाडाल
व्यवसायात कामाचा उरक पाडावा. नवीन कामे हाती घेण्यापूर्वी त्यातील बारकाव्यांचा नीट अभ्यास करावा. खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरीत अडथळे अडचणी आल्या तरी कामाचा वेग कमी होऊ देऊ नका. दुसऱ्यांवर विसंबून न राहता कामे हातावेगळी करा. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. राग आवरा, विद्यार्थ्यांनी एकाग्रता मिळवण्यासाठी प्रयत्नशील रहावे.
शुभ दिनांक : 27,28,31,1,2.

कन्या: सकारात्मक दृष्टीकोन
जीवनात सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन वागलात तर फायदा होतो हा अनुभव येईल. चांगली बातमी मन सुखावेल. अनपेक्षित, लाभाची शक्‍यता. नोकरदार महिलांना वरिष्ठांची अनुकंपा राहील. सवलती व भत्ते मिळतील. नोकरीत मनाप्रमाणे वागता येईल. महिलांना मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. तरी प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ दिनांक : 29,30,2.

तूळ: विशेष लाभ
ग्रहमान संमिश्र फळं देणारे आहे. व्यवसायात बदल करून उलाढाल वाढवाल. कामात नवीन विचारांचा अवलंब कराल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची किंमत कळेल. त्यामुळे ते तुमची खुशामत करतील. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिलांना प्रियजन नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीने आनंद वाटेल. तरूणांचे विवाह जमतील. प्रकृती उत्तम राहील.
शुभ दिनांक : 27,28,31,1.

वृश्‍चिक: प्रयत्नांना यश
प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यायचा हे तुम्ही ठरवायचे आहे. वेळेचे व कामाचे गणित योग्य आखून त्याप्रमाणे वागाल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. पैशाची वसुली होईल. नोकरीत मानसन्मानाचे योग येतील. महत्वाच्या कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवली जाईल. महिलांच्या शब्दाला घरात मान मिळेल.
शुभ दिनांक : 27,28,29,30,2.

धनु: स्वभावाचा फायदा
खाण्यापिण्यावर बंधन ठेवलेत तर प्रकृतीची उत्तम साथ मिळेल. व्यवसायात तुमच्या जिद्दी व प्रयत्नवादी स्वभावाचा विशेष फायदा होईल. कामांचा वेग वाढेल. पैशाची स्थितीही समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करणे भविष्यात लाभदायी ठरेल. हातून चांगले काम होईल. महिलांना कामाचे समाधान मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. मुलांकडून सुवार्ता कळेल.
शुभ दिनांक : 27,28,29,30,31,1.

मकर: वरिष्ठांची मर्जी पाळावी
व्यवसायात नवीन आव्हाने स्वीकारून ती तडीस न्याल. काही बदल करावेसे वाटतील. तरी थोडा धीर धरा, मोठ्यांचा सल्ला महत्वाचे निर्णय घेतांना घ्या. व्यवहारी दृष्टीकोन लाभदायी ठरेल. नोकरदार व्यक्तींनी हातातील कामे वेळेत संपवावीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून खुबीने वागावे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येईल.
शुभ दिनांक :27,28,29,30,31,1,2.

कुंभ: कामाचे कौतुक
तब्येत सांभाळून कामे हाती घ्या व्यवसायात विस्तार कराल. फायदा मिळवून देणारी कामे हाती घेऊन ती पूर्ण कराल. पैशाची तजबीज होईल. नोकरदार महिलांना मनाप्रमाणे कामे करता येतील. कामाचे कौतुक होईल. नोकरीत बदल किंवा बदलीसाठी प्रयत्न करा, यश मिळेल. खर्चही मनाप्रमाणे कराल. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान.
शुभ दिनांक : 27,28,29,30,31,1,2.

मीन: ताळेबंद करा
पैशाचे व्यवहार करतांना त्याचा ताळेबंद आधी करा मगच पुढे जा, व्यवसायात कुवत ओळखून उडी घ्या. नाचरेपणा नको. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत कामात तत्पर रहाल. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांवर विसंबून राहू नका. सकारात्मक दृष्टीकोन विशेष लाभदायी ठरेल. कामाचा आनंद मिळेल. दगदग धावपळ होईल.
शुभ दिनांक : 29,30,31,1,2.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)