उत्तर प्रदेश; दहशतवादविरोधी पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्याची आत्महत्या

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकातील वरिष्ठ अधिकारी राजेश साहनी यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे. ते एटीएसमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी कार्यरत होते. साहनी आज सकाळी त्यांच्या कार्यालयात मृतावस्थेत आढळून आले.

सूत्रांच्या माहितीनुसार, राजेश साहनी यांनी स्वत:वर सर्व्हिस रिव्हॉवरमधून गोळी झाडली. यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  गेल्याच आठवड्यात उत्तराखंडमध्ये एका पाकिस्तानी हस्तकाला अटक करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. राजेश सहानी 1992 सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून पोलीस दलात मोठी खळबळ माजली. या घटनेनंतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरु आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गोमती नगर येथे एटीएसचे मुख्यालय आहे. आज दुपारी एक वाजता राजेश सहानी यांच्या कार्यालयातून गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आला. त्यापूर्वी सहानी यांनी आपल्या ड्रायव्हरकडून गाडीतील सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मागवून घेतली होती. गोळी झाडल्याचा आवाज ऐकल्यानंतर पोलीस कर्मचारी आतमध्ये धावत गेले. त्यावेळी राजेश सहानी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)