उत्तर प्रदेशात नाश्ता लवकर न दिल्याने पत्नीची हत्या

ग्रेटर नोएडा : घरगुती वादातून नवऱ्याने पत्नीचा खुन केल्याची घटना उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे घडली आहे. नाश्ता वेळेवर न दिल्यानं ३२ वर्षीय मुकेश कुमार यानं त्याच्या पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली. मुकेशला पोलिसांना अटक केली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने त्याच्या पत्नीला नाश्ता मागितला होता परंतू काही कारणामुळं नाश्ता देण्यासाठी उशीर झाल्यानं मुकेशनं त्यांच्या मुलांसमोर ओढणीने पत्नीचा गळा आवळला. हे पाहिल्यानंतर मुकेशच्या मुलांनी आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावले. शेजाऱ्यांनी मुकेशच्या पत्नीला तत्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतू डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एका खासगी कंपनीत कामगार असलेला मुकेश कुमार त्याची पत्नी रेखा, मुलगा आणि मुलगी यांच्यासोबत कुलेसरा गावात भाड्याने पाहत होता. मुकेश आणि त्याच्या पत्नीमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून सतत भांडणे होत असत. शनिवारी देखील नाश्ता लवकर न दिल्याने मुकेशचा पारा चढला होता आणि दोघांचे भांडण सुरू झाले. या शुल्लक कारणामुळे भांडण झाल्याने मुकेशच्या पत्नीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या मुलांना घेऊन घराच्या बाहेर पडत असताना मुकेशने तिचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला आणि तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)