उत्तर प्रदेशात जातीय संघर्षानंतर तणाव

शहाजहानपूर: दोन समुदायातील जातीय हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर जिल्ह्यामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. एका गुरुद्वाराच्या बाहेर राख्या विकणाऱ्या एका मुलीला रखवालदाराने विरोध केल्यानंतर या संघर्षाला सुरुवात झाली. यावेळी सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. पोलिसांच्या वाहनांचेही नुकसान झाले असून याबद्दल शेकडो व्यक्‍तींच्या विरोधात दंगल माजवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती अतिरिक्‍त पोलिस अधिक्षक (ग्रामीण) सुभाष चंद्र शाक्‍य यांनी सांगितले.

हिंसाचाराची बातमी पसरताच दोन्ही समुदायाचे लोक घटनास्थळी एकत्र आले आणि त्यांनी दगडफेकीस सुरुवात केली. या प्रकरणी दोन्ही बाजूच्या 80 लोकांविरोधात आणि शेकडो अनोळखी लोकांविरोधात दंगल माजवणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याच्या आरोपांखाली एफआयआर दाखल केली गेली आहे, असे पोलिसांनी सांगितले. या भागात कायदा आणि सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या हिंसाचाराला कारणीभूत असलेल्या व्यक्‍तीची ओळख सीसीटिव्हीच्या आधारे पटली असून त्यांना अटक केली जाईल. तसेच हिंसाचार घडवून वातावरण दूषित करणाऱ्यांनाही सोडले जाणार नाही, असेही पोलिसांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)