उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघातात १२ जण ठार

लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखमीपूर खीरी येथे आज पहाटे ट्रक आणि टाटा मॅजिक यांच्यात धडक झाली. या अपघातात दोन महिलांसहित १२ जण ठार झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. लखमीपूर खीरी येथे राष्ट्रीय महामार्गावर ‘पापा जी का ढाबा’ जवळ हा अपघात झाला.

शाहजहाँपूर येथून येणारी टाटा मॅजिक थेट ट्रकमध्ये घुसली. त्यामुळे टाटा मॅजिक गाडीतील १७ पैकी १२ जण जागीच ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. अपघातातील जखमींना सीतापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)