उत्तर कर्नाटकचे स्वतंत्र राज्य करा…

भाजपच्याच आमदाराची मागणी
बंगळुरू – मोलकालमोरू मतदार संघातील भाजपचे शक्तीशाली आमदार बी श्रीमालू यांनी उत्तर कर्नाटक हे स्वतंत्र राज्य करावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे भाजपची पंचाईत झाली आहे. उत्तर कर्नाटकाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा यांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर त्यांच्याच पक्षाच्या नेत्याने ही मागणी लाऊन धरल्यामुळे भाजप नेत्यांना तोंडघशी पडल्यासारखे झाले आहे. भाजपच्या खासदार शोभा करंदलजे यांनीही स्वतंत्र राज्याची मागणी वेडेपणाची असल्याचे म्हटले होते.

उत्तर कर्नाटकाला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी काहीं संघटनांनी येत्या 2 ऑगस्ट रोजी बंद पुकारला आहे. त्या बंदला आपला पाठिंबा राहील असेही श्रीमालू यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसचे नेते एच. के. पाटील यांनी राज्य सरकारने उत्तर कर्नाटक भागावर सातत्याने अन्याय केला आहे असे म्हटले आहे. त्यांची मागणीही श्रीमालू यांनी उचलून धरली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)