उत्तरप्रदेशात तुफानी पावसाचे 49 बळी

संग्रहित छायाचित्र

लखनौ – उत्तरप्रदेशात गुरूवारपासून सर्वत्र तूफान पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुरजन्य स्थिती आणि पडझडीच्या घटना घडल्या त्यात आत्ता पर्यंत गेल्या दोन दिवसांत किमान 49 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यात सर्वाधिक जीवित हानी सहारणपुर जिल्ह्यात झाली असून तेथे 11 तण मरण पावले आहेत.

आग्रा आणि मेरठ येथे प्रत्येकी सहा जण मरण पावले असून बरेली, बागपत, बुलंदशहर या जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर कानपुरदेहात, मथुरा, गाझीयाबाद, हापुरू, रायबरेली, जालौन, जानपुर, प्रतापगड, बांदा, फिरोजाबाद, अमेठी, कानपुर आणि मुज्जफरनगर या जिल्ह्यात प्रत्येकी एक जण बळी गेल्याचे वृत्त आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हाधिकारी आणि महुसल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या भागाचा व्यापक दौरा करून नुकसानीचा अंदाज घ्यावा आणि आपदग्रस्तांना त्वरीत आवश्‍यक ती मदत करावी अशी सूचना मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)