उत्तरप्रदेशातील चकमकीत दोन ठार

लखनौ: उत्तरप्रदेशातील आमरोहा जिल्ह्यात रविवारी स्थानिक गुंड आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमक झाली. त्यात एक गुंड आणि एक पोलिस कॉन्स्टेबल असे दोन जण ठार झाले. या घटनेच्या संबंधात माहिती देताना पोलिसांनी सांगितले की इंद्रपुर गावात ही चकमक झाली. तेथे काही गुन्हेगार एकत्र जमले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी एका गुन्हेगाराने पोलिसांवर गोळीबार केला त्यानंतर ही चकमक झाली. त्यात हर्ष चौधरी नावाचा कॉन्स्टेबल शहीद झाला तर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शिवअवतार नावाचा एक गुन्हेगार ठार झाला.

मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी शहीद कॉन्टेबलच्या कुटुंबियांना चाळीस लाखांची नुकसान भरपाई जाहीर केली असून त्यांच्या आई वडिलांना त्यांनी दहा लाख रूपये वेगळे जाहीर केले आहेत. सदर कॉन्स्टेबलच्या पत्नीला विशेष पेन्शन जाहीर केली असून त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)