उत्कर्ष पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

सभासदांना सलग 7 व्या वर्षी 15 टक्‍के लाभांश जाहीर
वाई, दि. 30 (प्रतिनिधी)- उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुरलीधर मंगल कार्यालय, ब्राम्हणशाही येथे पार पडली. संस्थेचे संस्थापक आनंद कोल्हापुरे यांचे प्रतिमेचे पूजन संस्थेचे ज्येष्ठ सभासद विनायक पोरे यांच्या हस्ते करण्यात आले आणि सभेचे कामकाज सुरू करण्यात आले. तसेच अहवाल सालातील संस्थेचे ज्येष्ठ संचालक कै. डॉ. जयघोष कद्‌दू, हितचिंतक कै. सुरेखा यादव, ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी कै. यमुनाताई वाईकर तसेच संस्थेचे सभासद, खातेदार, ठेवीदार, सीमेवरील शहिद झालेले जवान यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. संस्थेचे संचालक अमर कोल्हापुरे यांनी प्रास्ताविक व्यक्‍त केले. यामध्ये अहवाल सालातील प्रगतीचा आढावा त्यांनी सांगितला, अहवाल पत्रिकेतील विविध विषयांचे वाचन मुख्य शाखा व्यवस्थापक श्री. बाबूराव देशमुख, शाखाप्रमुख राजेश गुरव, सौ. रंगता बेडेकर, सौ. शिवानी पावशे यांनी केले.
विषय पत्रिकेतील विषयांना सूचक अनूमोदक म्हणून श्री. सुनिल शिंदे, श्री. अनिल पटवर्धन, श्री. शिवाजी निंबाळकर, श्री. रामचंद्र कानडे, श्री. धर्मराज भोसले, श्री. शरद भोसले, श्री. सोपानराव झोरे, इ. सभासदांनी सहभाग घेतला.
आदर्श कर्जदार म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात श्री. गोविंद इथापे, श्री. रविंद्र भोसले तसेच आदर्श ठेवीदार म्हणून श्री. बाळकृष्ण फरांदे, श्री. चंद्रकांत मापारी, सौ. शितल इंगुळकर यांचा तर श्री. गोविंद चव्हाण यांचा आदर्श सभासद म्हणून सत्कार करण्यात आला. संस्थेचे सभासद बाळकृष्ण वाघ व सुधीर होमकर यांनी आपले मनोगत व्यक्‍त केले.
संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांना सहकार भूषण पुरस्कार मिळाल्याबद्‌दल अभिनंदन करण्यात आले. तसेच यशवंतनगर शाखेचे शाखाप्रमुख व विद्यमान नगरसेवक राजेश गुरव यांची वाई नगरपालिकेच्या शिक्षण सभापती या पदावर नेमणूक झाल्याबद्‌दल त्यांचा सत्कार करण्यात आला. आपले मनोगत व्यक्‍त करताना त्यांनी सांगितले की, आदरणीय आण्णांची तत्वे आणि सहकारी संचालक व सभासद, कर्मचारी यांच्या सहकार्याने संस्था यशस्वी होत आहे. तसेच सभासद, ग्राहकांनी संस्थेच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार संचालक मंडळ, ज्येष्ठ सभासद, मुख्य व्यवस्थापक श्री. प्रकाश पवार व संस्थेच्या इतर कर्मचा-यांच्या हस्ते करण्यात आला. सभेचे सूत्रसंचालन सौ. रंगता बेडेकर यांनी केले तर संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र धुमाळ यांनी आभार व्यक्‍त केले. ज्येष्ठ संचालक अशोक शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्‍त करताना संस्थेच्या पारदर्शक कारभाराबद्‌दल आणि सभासद व संस्था नाते संबंधाबद्‌दल कवितेच्या माध्यमातून विचार व्यक्‍त केले. सभेसाठी संचालक ऍड. रमेश यादव, जमीरभाई शेख, डॉ. मंगला अहिवळे, आनंदराव कांबळे, मदनकुमार साळवेकर, श्रीकांत शिंदे, डॉ. विनोद मिरजकर, डॉ. सुनिल कारळे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)