उंदीर, घुशी आणि खेकड्यांमुळेच कालवा फुटला – गिरीश महाजन

पुणे: कालव्याच्या कडेने प्रचंड अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे उंदीर, घुशी मोठ्याप्रमाणात झाले आहेत. तसेच पाण्यातून वाहात आलेले खेकडेही आहेत. कालव्यात मातीचा बेस असतो त्यामुळे घुशी, उंदीर, खेकडे हे जमीन पोखरत जातात. हा प्रकार 12 महिने 24 तास सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यामुळेच हा प्रकार झाल्याचा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

गुरूवारी घडलेल्या या घटनेनंतर महाजन यांनी शुक्रवारी कॅनॉलच्या कामाची पाहणी केली आणि बाधितग्रस्तांची भेट घेतली.
केबल, उंदीर, घुशी यांच्यामुळे कि नेमका कशामुळे हा प्रकार झाला, असे विचारले असता त्यांनी उंदीर, घुशी आणि खेकड्यांमुळेच हा प्रकार झाल्याचे ठामपणे सांगितले. याठिकाणी कोणी मुद्दाम भगदाड पाडले आहे किंवा ब्लास्ट केला आहे असे नाही तर खेकडे जमिनीत जातात, घुशी खूप खोल जमीन पोखरतात, त्यामुळेच हा प्रकार झाल्याचे महाजन यांनी ठामपणे सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाटबंधारे खात्याच्या मुख्य अभियंत्याच्या अध्यक्षतेखालील समिती चौकशी करणार

झालेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी पाटबंधारे खात्याच्या मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. यातून केबलमुळे हा प्रकार झाला की उंदीर, घुशी, खेकडे यांच्यामुळे झाला याची चौकशी ही समिती करेल. तसेच या समितीने येत्या दोन-तीन दिवसांत चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कालव्याला भगदाड पडल्याचे जर आधी समजले होते का, कोणी कळवळे होते, कोण वेळेत पोहोचले नाही, कोणी दुर्लक्ष केले हे या चौकशी अहवालातून स्पष्ट होईलच, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)