‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या सशक्त करणार – केंद्रीय कृषिमंत्री

मुंबई: देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’ प्रकल्पाच्या माध्यमातून सशक्त करण्याला केंद्र शासनाने प्राधान्य दिले आहे. याद्वारे शेतकऱ्यांना सक्षम करताना बाजार समित्यांच्या जोखडातून त्यांना मुक्त करावयाचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी केले.

क्रॉप केअर फांऊडेशन ऑफ इंडियाद्वारे आयोजित ‘शेती अधिक किफायतशीर करण्यासाठी सरकार, उद्योग आणि शेतकरी एकत्र काम करु  शकतात’ या विषयावरील  एक दिवसीय परिषदेमध्ये केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह बोलत होते. यावेळी केंद्रीय कृषि राज्यमंत्री पुरूषोत्तम  रुपाला, राज्याचे कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, यूपीएलचे अध्यक्ष रज्जू श्रॉफ, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव एकनाथ डवले, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. विलास फाले आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिंह म्हणाले, आज देशातील शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आहेत, या अडचणी दूर करावयाच्या असतील तर सरकार आणि उद्योगपतींनी एकत्र येऊन कृषी क्षेत्राला मदतीची गती वाढवण्याची गरज आहे. शेतकरी जगला तर देश जगेल हे आपण लक्षात घेतले पहिजे. कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात वित्तीय तरतुदी उपलब्ध करून दिल्या आहेत. महाराष्ट्र सरकारनेही कृषिकेंद्रित अनेक निर्णयांची अंमलबजावणी केली आहे. जलयुक्त शिवारसारख्या महत्वाकांक्षी योजनेने राज्यातील अनेक गावे जलसंपन्न झाल्याचेही ते म्हणाले. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवित आहे, ज्याद्वारे त्यांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा मिळत आहे. यामध्ये कृषिपूरक उत्पादनांवर आधारित उद्योगांची भूमिका महत्त्वाची आहे. मोदी सरकारने राष्ट्रीय आपत्ती निधीतून भरघोस मदत केली आहे. प्रधानमंत्री कृषी फसल विमा योजनेतून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)