ई-कॉमर्स, रिटेल, बांधकाम क्षेत्रांत रोजगार वाढणार

नवी दिल्ली – 2018 मध्ये ई कॉमर्स, रिटेल, इन्फ्रास्ट्रक्‍चर आणि बीएफएसआय या क्षेत्रांमधून एकूण 10 लाखापेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होईल असे इंडियन स्टाफिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले. देशात औपचारिक रोजगारनिर्मिती करणाऱ्या 15 क्षेत्रांमधील ही क्षेत्रे आहे. या 15 औपचारिक क्षेत्रातून 81 टक्‍के रोजगारनिर्मिती करण्यात येते. भारतातील फ्लेक्‍झी स्टाफिंग बाजारपेठ 28,215 कोटी रुपयांची असल्याचे म्हणण्यात आले.

यांत्रिकीकरण आणि नावीण्यतेमुळे काम करण्याची पद्धत बदलत आहे. बीएफएसआय क्षेत्राचा 12 टक्‍के, इन्फ्रास्ट्रक्‍चर, बांधकाम आणि एनर्जी क्षेत्र 11 टक्‍के, रिटेल, ई कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांकडून फ्लेक्‍सी स्टाफमधील 5 टक्‍के रोजगारनिर्मिती करण्यात येते. रिटेल क्षेत्राचा विस्तार केवळ मेट्रो शहरात होत नसून टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्येही विस्तार दिसून येतो. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या अहवालानुसार, 2021 पर्यंत संघटित रिटेल क्षेत्राकडून 12 लाख, बांधकाम आणि रिअल इस्टेटकडून 1.4 लाख, बीएफएसआय 52,500 आणि वाहन क्षेत्राकडून 43 हजार रोजगारनिर्मिती करण्यात येईल. ईपीएफओच्या आकडेवारीनुसार औपचारिक क्षेत्रात प्रतिमहिन्याला सहा लाख रोजगारनिर्मिती होत आहे. अीाता अर्थव्यवस्थेला आणखी वेग येण्याची शक्‍यता असल्यामुळे रोजगारनिर्मिती वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)