“ईव्हीएम हटाव, देश बचाव’ – राष्ट्रवादी कॉंग्रेसची निदर्शने

जंतर-मंतरवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची निदर्शने
नवी दिल्ली – देशभरात विविध राजकीय पक्षांकडून ईव्हीएमविरोधात आवाज उठवला जात आहे. ईव्हीएम हटवण्याच्या मागणीवरून आज राष्ट्रवादीच्या खासदारांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर निदर्शने केली. राष्ट्रवादीच्या खासदारांनी “ईव्हीएम हटाव, देश बचाव’ अशी घोषणाबाजी यावेळी केली. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, धनंजय महाडिक, वंदना चव्हाण, फौजिया खान उपस्थित होते.

ईव्हीएम विरोधात असणारे सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधींनी मंगळवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. देशभरातील जवळपास 17 राजकीय पक्षांनी ईव्हीएमला विरोध दर्शविला आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा होत असल्याचा या सर्व राजकीय पक्षांना संशय आहे. त्यामुळे येत्या काळात निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ईव्हीएमवर बंदी घालण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. निवडणुका पारदर्शक होण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. निवडणूक आयोगावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि ते आम्हाला न्याय देतील, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)