ईव्हीएम हटाओ, देश बचाओ

संविधान सन्मानार्थ राष्ट्रवादीची निदर्शने

सातारा, दि.25 (प्रतिनिधी) – ईव्हीएम हटाओ, देश बचाओ घोषणाबाजी करत राष्ट्रवादी महिला संघटनेने माजी मंत्री फौजिया खान व आमदार विद्या चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनासमोर निदर्शने केली. यावेळी कविता म्हेत्रे, सुरेखा पाटील, जयश्री पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना फौजिया खान म्हणाल्या, तंत्रज्ञान म्हणून कॉंग्रेसने ईव्हीएम मशीन देशात आणल्या. मात्र भाजपकडून ईव्हीएम मशीनचा गैरवापर सुरू करण्यात येत असल्याने देशातील 17 पक्षांनी ईव्हीएमद्वारे निवडणुका नको अशी तक्रार आयोगाकडे केली आहे. मात्र, भाजप अद्यापही ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणूक घेण्यावर ठाम असून त्यांची भूमिका लोकशाहीसाठी घातक आहे. जगात यापूर्वीच यूरोपसह अनेक देशांनी ईव्हीएम बंद करून मतपत्रिकेद्वारे निवडणुका सुरू केल्या असून केवळ भारत, नायजेरिया सह उर्वरित तीनच देशांमध्ये सध्या ईव्हीएमद्वारे निवडणुका होत असल्याचे खान यांनी निदर्शनास आणून दिले.
तसेच देशात संविधान बदलण्याची भाषा यापूर्वी केंद्रीय मंत्री हेडगे यांनी केली तर नुकतेच दिल्ली येथे जंतर-मंतरवर संविधानाच्या प्रती जाळण्यात आल्या. अशा घटना घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मन की बात कार्यक्रमात ब्र शब्द काढत नाहीत यावरून त्यांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होऊ लागला आहे. म्हणूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसने 26 जानेवारी पासून राज्यासह देशभरात संविधान बचाओ, देश बचाओ कार्यक्रम हाती घेतला असून त्यापैकी पश्‍चिम महाराष्ट्राचा मेळावा येत्या 3 ऑक्‍टोबर रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचे खान यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादीत घराणेशाही नाही
संविधान बचाओ, देश बचाओ हा कार्यक्रम देशभर राबविण्याची जबाबदारी खा. शरद पवार यांनी महिलांवर सोपविली असल्याचे फौजिया खान यांनी सांगितले. त्यावर, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत किती महिलांना उमेदवारी मागणार असल्याचे पत्रकारांनी त्यांना विचारले. त्यावर त्यांनी सक्षम महिला उमेदवारांना निश्‍चितपणे उमेदवारी देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. त्यावर सक्षमतेचा निकष म्हणजे घराणेशाही असा पक्षाचा निकष आहे का, असे पत्रकारांनी विचारले. त्यावर राष्ट्रवादीत कोणतीही घराणेशाही नसून मी तसेच उपस्थित आमदार विद्या चव्हाण, पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले या सर्वसामान्य कुटुंबातीलच असल्याचे खान यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)