‘ईव्हीएम’ वापरल्यास सर्व पक्षांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकावा: राज ठाकरे

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे प्रमुख राजकीय पक्षांना मतदानासाठी व्हीव्हीपीएटी मशिनशिवाय ईव्हीएम वापरल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन केले आहे.
२०१४च्या निवडणुकांनंतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उठत आहे. अनेक मतदार संघांमध्ये आमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चांगली कामे करून देखील त्यांना निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. काही ठिकाणी तर उमेदवाराला शून्य मतं  मिळाली, शून्य मतं मिळणं कसं शक्य आहे? असा सवाल देखील त्यांनी पत्राद्वारे उपस्थित केला आहे.
जगभरामध्ये अनेक पुढारलेल्या देशांनी देखील ईव्हीएम मशीनला नाकारले आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, जपान, नेदरलँड, कोरिया या देशांमध्ये अजूनही मतपत्रिकांद्वारेच मतदान घेतले जाते. मग भारतामध्येच ईव्हीएमचा वापर का? असे देखील त्यांनी पत्राद्वारे म्हंटले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव सचिन मोरे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की “राज ठाकरेंनी सदर पत्राबाबरोबरच एक पेनड्राइव्ह पाठवला असून ज्यामध्ये ईव्हीएम मशीन कशे ‘हॅक’ केले जाऊ शकते हे सांगणारा एक व्हिडीओ आहे.”
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)