ईव्हीएम नकोतच; पुढील निवडणूक मतपत्रिकांच्या माध्यमातून घ्या

70 टक्के राजकीय पक्षांची मागणी; भाजप पडला एकाकी

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत आज अनेक राजकीय पक्षांनी इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) वापराला कडाडून विरोध दर्शवला. कॉंग्रेसने केलेल्या दाव्यानुसार तर 70 टक्‍क्‍यांहून अधिक राजकीय पक्षांनी पुढील लोकसभा निवडणूक मतपत्रिकांच्या माध्यमातून घेण्याची जोरदार मागणी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ईव्हीएमच्या विश्‍वासार्हतेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे बैठकीत मतपत्रिकांची जुनीच पद्धत वापरण्याची मागणी मांडण्यात आली. या मागणीवरून भाजप एकाकी पडला, असे कॉंग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. कॉंग्रेसचा दावा खरा मानला तर भाजपच्या मित्रपक्षांनीही ईव्हीएमविरोधात मत नोंदवल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, मत योग्यप्रकारे नोंदले गेल्याची खातरजमा होण्यासाठी किमान 30 टक्के मतदान केंद्रांवर ईव्हीएमसमवेत पेपर ट्रेल जोडण्याचा पर्यायही विरोधी पक्षांनी सुचवला. निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या खर्चावर मर्यादा आणली जावी, अशी मागणी कॉंग्रेसने बैठकीत केली. सध्या केवळ उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या निवडणूक खर्चावर मर्यादा आहेत. मध्यप्रदेश आणि राजस्थान या भाजपशासित राज्यांमधील मतदारयाद्यांमध्ये अनुक्रमे 60 आणि 45 लाख बनावट नावे असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून केला जात आहे. तो मुद्दाही आजच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)