ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात संशयाचे भूत – शरद पवार

मुंबई – लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरु असून देशात भगवी लाट असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. यावर आता विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. लोकांच्या मनात ईव्हीएमबाबत संशयाचे भूत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हंटले आहे.

शरद पवार म्हणाले कि, लोकांच्या मनात ईव्हीएमबाबत संशयाचे भूत असून यापूर्वी नरसिंहराव, राजीव गांधी यांचा देखील भरघोस मताधिक्याने विजय झाला होता, पण त्यावेळी ईव्हीएमवर शंका उपस्थित झाल्या नव्हत्या. पण यंदा प्रथमच ईव्हीएमबाबत शंका उपस्थित होत आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांचाही मताधिक्याने विजय झाला होता. परंतु, त्यावेळी कोणी शंका घेतली नव्हती.  वंचित बहुजन आघाडीचा काय परिणाम झाला ते आत्ता सांगणे कठीण असल्याचेही पवारांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.