‘ईदगाह’ कथेतील हमीद आहे उज्ज्वला योजनेमागची प्रेरणा- पंतप्रधान

नवी दिल्ली :  उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महिलांपर्यंत एलपीजी गॅस पोहोचवण्याची प्रेरणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुन्शी प्रेमचंद यांची प्रसिद्ध कथा ‘ईदगाह’मधून मिळाली असल्याचं मोदींनी सांगितलं आहे.

मोदी म्हणाले की, “ईदगाहमध्ये हमीद नावाचा एक मुलगा असतो. तो जत्रेत मिठाई खरेदी करण्याऐवजी आपल्या आजीसाठी चिमटा खरेदी करतो. स्वयंपाक करताना आजीला चटका लागू नये यासाठी त्याने तो चिमटा खरेदी केलेला असतो. मुन्शी प्रेमचंद यांची ही कथा आजही मला प्रेरित करते. माझं म्हणणं आहे की, जर हमीद असं काही करु शकतो तर मग देशाचा प्रधानमंत्री का करु शकत नाही ?”. मोदींनी ट्विटरच्या माध्यमातूनही या कथेचा उल्लेख केला. “प्रेमचंद यांची कथा ईदगाह मी कधीच विसरु शकत नाही. ईदगाह अत्यंत भावनिक गोष्ट आहे’, असं मोदींनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/narendramodi/status/1001011312661532673

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)