ईडीकडून मुंबईतील चार्टर्ड अकाऊंटंटला अटक

नवी दिल्ली – तब्बल 834 कोटी रूपयांच्या मनी लॉण्डरिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईस्थित चार्टर्ड अकाऊंटंटला (सीए) अटक केली. दिनेश जाजोदिया (वय 51) असे त्याचे नाव आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्‍टच्या (पीएमएलए) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

परदेशांत आणि विशेषत: संयुक्त अरब अमिराती, हॉंगकॉंग आणि ब्रिटीश व्हर्जीन बेटावर असलेल्या विविध कंपन्यांचा संचालक म्हणून जाजोदिया सक्रिय आहे. त्याच्यावर अवैध मार्गाने पैशांचे व्यवहार केल्याचा आरोप आहे. चुकीच्या मार्गाने लाभ मिळवण्यासाठी त्याने विविध देशांत बनावट कंपन्या स्थापून भागधारक आणि परदेशस्थ गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे फसवणुकीसाठी गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्यावरून त्याला अटक करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)