ईएलएसएसमध्ये एकरकमी गुंतवणूक टाळा (भाग-२)

ईएलएसएसमध्ये एकरकमी गुंतवणूक टाळा (भाग-१)

ईएलएसएस फंडात गुंतवणूक करताना तुम्ही वैयक्तिक आर्थिक उद्दीष्ट आणि जोखिम पचवण्याची ताकद या गोष्टींचा विचार केला पाहिजे. शेवटी एकरकमी गुंतवणूक करायची की एसआयपीद्वारे दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत राहायची हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. परंतु अनेक कारणांसाठी एसआयपी ही गुंतवणुकीची आदर्श पद्धत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जोखमीची विभागणी –
ईएलएसएसमधील गुंतवणूक प्रामुख्याने शेअर बाजारात असल्याने एकरकमी गुंतवणूक करणे जास्त जोखमीचे ठरू शकते. कारण शेअर बाजारात काय स्थिती आहे याचा विचार न करता तुम्ही एकरकमी गुंतवणूक करत असता. मार्केट वरच्या पातळीवर असताना तुमची गुंतवणूक झाली तर ते घातक ठरण्याची शक्यता असते. त्याउलट एसआयपीद्वारे दरमहा गुंतवणूक होत राहिल्याने पूर्ण आर्थिक वर्षात जोखमीची विभागणी होत राहते. मार्केट प्रतिकूल स्थितीत असताना आपण प्रवेश करण्याची जवळपास संपुष्टात येते आणि जोखीमही कमी होते.

रुपयाच्या मूल्याची सरासरी
जेव्हा दर महिन्याच्या विशिष्ट तारखेला गुंतवणूक केली जाते तेव्हा शेअरबाजारातील चढउताराचा फायदा मिळतो. जेव्हा बाजारात घसरण झालेली असते तेव्हा तुम्हाला एनएव्हीनुसार तुलनेत जास्त युनिट मिळतात. त्याउलट जेव्हा शेअर बाजार वरच्या पातळीवर असतो तेव्हा सरासरी कमी युनिट मिळतात.

आर्थिक शिस्त
एसआयपीचा पर्याय निवडून तुम्हाला दरमहा कमी रकमेची गुंतवणूक करण्याची सवय लागते. त्यातून मग गुंतवणूक ही तुमच्या करनियोजनाचा अविभाज्य भाग बनते.

ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करताना प्राप्तीकर सवलत मिळण्याबरोबर त्यातून संपत्ती निर्मिती म्हणजेच परतावा मिळण्याचेही नियोजन करा. त्यासाठी सलग पाच ते सात वर्षे गुंतवणूक करत राहण्याचे उद्दीष्ट ठेवा.

– चतुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)