ईएलएसएसमध्ये एकरकमी गुंतवणूक टाळा (भाग-१)

प्राप्तीकराचे नियोजन हा वार्षिक आर्थिक नियोजनाचा अविभाज्य भाग आहे. काही विशिष्ट साधनांद्वारे गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या करप्राप्त उत्पन्नातून सवलतीस पात्र ठरू शकता. प्राप्तीकर कायद्यातील कलम 89 सी नुसार ही सवलत मिळते. त्यानुसार गुंतवणुकीचा सगळ्यात लोकप्रिय प्रकार म्हणजे म्युच्युअल फंडांच्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) मध्ये गुंतवणूक करणे. विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक असणाऱ्या ईएलएसएस योजनांमधून गुंतवणुकीवर परतावा तर मिळतोच त्याचबरोबर प्राप्तीकरात सवलत असा दुहेरी फायदा होतो. मात्र बहुसंख्य नोकरदारांना जानेवारी, फेब्रुवारी उजाडला की प्राप्तीकर आणि त्यावर मिळणाऱ्या सवलतीसाठीची गुंतवणूकीचीआठवण येते. मग कुठून तरी रक्कम जमा करून ईएलएसएस फंडात मोठी रक्कम गुंतवली जाते. अशी एकरकमी वार्षिक गुंतवणूक करण्यापेक्षा दर महिन्याला ठराविक रक्कम ईएलएसएस फंडात गुंतवली तर एकदम येणारा मोठा आर्थिक ताण वाचतो आणि त्याचबरोबर दरमहा किंवा नियमित कालावधीत गुंतवणूक करत राहिल्याने परताव्यावरही सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसते.

ईएलएसएस फंड तुम्ही गुंतवलेले पैसा शेअर बाजारातील विविध क्षेत्रातील आणि विविध आकारांच्या (लार्जकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप) कंपन्यांमध्ये गुंतवतात. त्यातून तुमच्या गुंतवणुकीवर दीर्घकाळात चांगला परतावा तयार होतोच पण दरवर्षी तुम्हाला प्राप्तीकरात ठराविक सवलत मिळत राहते. अर्थात या फंडांमधील रक्कम गुंतवणुकीच्या तारखेपासून किमान तीन वर्षे काढून घेता येत नाही. कलम 80 सी नुसार पीपीएफ आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रातील गुंतवणुकीवरही प्राप्तीकरात सवलत मिळते. मात्र पीपीएफचा लॉक इन कालावधी 15 वर्षे तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांसाठी तो पाच वर्षे इतका आहे. अर्थात पीपीएफ आणि एनएससीमधील गुंतवणूक अधिक सुरक्षित मानली जाते. ईएलएसएस लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे संपत्ती वृद्धी करण्याचे आणि त्याचवेळी प्राप्तीकरात सवलत आणि कमी लॉकिंग कालावधी.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ईएलएसएसमध्ये एकरकमी गुंतवणूक टाळा (भाग-२)

ईएलएसएसमधील एकरकमी गुंतवणूक आणि एसआयपी
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी एसआयपी आणि एकरकमी (ज्याला लम्पसम म्हटले जाते) गुंतवणूक असे दोन मार्ग उपलब्ध आहेत. या दोन्ही पद्धतीत गुंतवणुकीच्या दिवशी त्या योजनेची जी एनएव्ही (नेट असेट व्हॅल्यू) असेल त्याच्या पटीत तुम्हांला युनिट मिळतात. तुमच्या गुंतवणुकीचा प्रवाह (कॅश फ्लो) कसा वाहतो यामध्येच याचे गुपित दडलेले आहे. जेव्हा तुम्ही एकरकमी गुंतवणूक करता तेव्हा त्या दिवसाच्या एनएव्ही नुसार तुम्हाला युनिट मिळतात. एसआयपीमध्ये दर महिन्याला किंवा नियमित कालावधीत गुंतवणूक होत राहिल्याने बाजारातील चढउतारानुसार कमी-जास्त युनिट मिळत राहतात आणि सरासरीचा विचार करता एसआयपी फायदेशीर ठरते. त्यामुळेच दर महिन्याला वेतनातून ठराविक रक्कम कपात होऊन एसआयपीद्वारे तुम्ही निवडलेल्या ईएलएसएस फंडात जमा होत राहणे हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. आता दरमहा ठराविक रक्कम भरणे तुमच्यासाठी शक्य नसेल तर मग एकदम रक्कम भरण्याचा मार्ग निवडणे योग्य.

– चतुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)