इस्लामिक सहकार्य संघटनेत पाककडून काश्‍मीरचा अनावश्‍यक उल्लेख

न्यूयॉर्क – इस्लामिक सहकार्य संघटनेमध्ये अत्यंत अनावश्‍यक असलेला काश्‍मीरचा मुद्दा पाकिस्तानकडून उपस्थित करण्यात आला असल्याची टीका भारताकडून करण्यात आली. पाकिस्तानच्या कृतीला भारताने जोरदार आक्षेप घेतला आहे. या संघटनेमध्ये पाकिस्तानकडून गटबाजीचा प्रयत्न झाला. तसेच भारतातील अंतर्गत बाबींवर बहुस्तरिय संघटनेच्या सदस्य देशांमध्ये चर्चा घडवून आणण्याचाही प्रयत्न अत्यंत अनावश्‍यक होता, अशी टीका भारताच्यावतीने करण्यात आली.

बुधवारी संयुक्‍त राष्त्राच्या 73 व्या महासभेच्या निमित्ताने इस्लामिक सहकार्य संघटनेची बैठक झाली होती. त्यामध्ये पाकिस्तान्हने काश्‍मीरचा मुद्द उपस्थित केला होता. मात्र इस्लामिक सहकार्य संघटनेमध्ये भारताच्या अंतर्गत मुद्दयांवर पुन्हा एकदा चर्चा झाली, ही खेदाची बाब असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते रवीश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भारताने या संदर्भात पाकिस्तानच्या संदर्भांचा निषेध केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताच्या अंतर्गत बाबींवर कोणतेही मतप्रदर्शन करण्याचा इस्लामिक सहकार्य संघटनेला कोणताही अधिकार नाही, हे भारताने पूर्वीही स्पष्ट केले आहे. या संघटनेतील सदस्य देशांनीही भारतातील मुद्दयांबाबत अशा मोठ्या व्यासपीठावर चर्चा करता कामा नये, अशी रवीश कुमार यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानकडून अशी कृती काही पहिल्यांदा केली गेलेली नाही. अशी कृती पाकिस्तानकडून वारंवार केली गेली आहे. अशी कृती जगभरात कोणत्याही आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मान्य केली जाऊ शकत नाही. पाकिस्तानचा दांभिकपणा आंतरराष्ट्रीय समुदायाने फेटाळला आहे, याची पाकिस्तानला जाणीव झाली आहे.

संयुक्‍त राष्ट्राच्या महासभेच्या निमित्ताने होणाऱ्या “सार्क’ बैठकीत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्यात द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्‍यता भारताने फेटाळली आहे. मात्र कुरेशी यांची भेट टाळता येऊ शकणार नाही, असेही परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)