इसिससोबत लागेबांधे; १९ रशियन महिलांना आजन्म कारावास

बगदाद (इराक) : इसिस या जहाल दहशतवादी संघटनेशी लागेबांधे असल्याच्या आरोपावरून १९ रशियन महिलांना आजन्म कारावास ठोठावण्यात आला आहे. इसिसशी संपर्क आणि पाठिंबा देणे यात या महिला दोषी आढळल्या आहेत. इराकच्या सुमारिया या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय इराकच्या मध्यवर्ती गुन्हे न्यायालयाने दिला आहे.

तेठ्ठील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून जवळपास ६० हून अधिक रशियन महिलांना ताब्यात घेण्यात आले होते. तर यापूर्वी अन्य दोन रशियन नागरिक आणि एका फ्रेंच नागरिकाला १७ एप्रिल रोजी याच आरोपावरून आजन्म कारावास सुनावण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इसिसच्या दहशतवाद्यांशी संपर्क ठेवल्यावरून आतापर्यंत जवळपास २० हजारावर नागरिकांना गजाआड करण्यात आले आहे. दरम्यान, याबद्दल इराक सरकारने अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)