इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांमुळे वाचनसंस्कृती ‘आॅनलाइन’

जागतिक पुस्तक दिनविशेष


ई- बुक्‍स, कॅफे, ऑडियोने घेतली पुस्तकांची जागा

पुणे – बदलत्या काळानुसार वाचन संस्कृतीमध्येही बदल होत आहेत. वाचनाची माध्यमे, जागा बदलत आहेत. पुस्तकांच्या जागी बऱ्याच प्रमाणात ई- बुक्‍स आणि वाचनालयाच्या जागी बुक कॅफे, ऑडियो बुक आले आहेत. इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट यामुळे वाचन संस्कृतीवर अवकळा आली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सध्याच्या यांत्रिक युगात नवीन पिढीला वाचनाचा विसर पडत आहे की काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

तरुण पिढी वाचत नाही अशी ओरड केली जात असली तरी ती प्रत्यक्षात चुकीची आहे. आमच्या प्रकाशन संस्थेत 12 वीपासून ते उच्चशिक्षण घेणारे अनेक तरुण मेंबर आहेत. विशेष म्हणजे पॉकेटमणीतून ही मुले पैसे वाचवून मेंबरशीप घेतात. वाचनाची गोडी तरुणवर्गात आहे. अनेक पुस्तकांना मोठ्या प्रमाणात तरुणांकडून मागणी होत आहे.
– रमेश राठीवाडे, अक्षरधारा, बुक गॅलरी.

जगप्रसिद्ध साहित्यिक आणि नाटककार शेक्‍सपिअर यांचा 23 एप्रिल हा स्मृतिदिन जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. वाचन संस्कृतीच्या चर्चेशिवाय पुस्तकदिन पोरकाच आहे. वाचन संस्कृतीवर आलेली अवकळा व इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट यांचा अकारण सकारण संबंध जोडला जातो. संबंधाचा सबळ पुरावा देण्यासाठी अलीकडच्या मुलांच्या वाचन सवयीवर अमर्याद चर्चा होऊन पूर्णविराम दिला जातो. मुले वाचत नाहीत. मुलांना पुस्तक उपलब्ध नाही. ही विधाने जितकी खरी वाटतात.

तितकेच प्रश्नही निर्माण करतात. कारण तरूण पिढी इलेक्‍ट्रॉनिक्‍स माध्यमाचा वापर करत असल्यामुळे वाचन संस्कृती बहरत आहे. प्रकाशन संस्थाकडूनही डिजिटल माध्यमातून पुस्तके उपलब्ध होत आहे. ई-बुक्‍स, ऑडियो बुक्‍स यांसारख्या माध्यमातून वाचन सहज सोपे झाल्याने तरूण वर्गाकडून वाचनाची गोडी वाढत आहे. वाचनाच्या बाबतीत आवडी- निवडीत बदल झाल्याचे प्रकाशन संस्थेकडून सांगण्यात येत आहे. पूर्वी काल्पनिक, मनोरंजक अशा पुस्तकांना मागणी होती. मात्र, आता, वास्तववादी, आत्मचरित्र, जीवनकथा अशा प्रेरणादायी पुस्तकांची मागणी वाढत आहे. पण त्याचबरोबर मृत्युंजय, छावा, ययाती, अमृतवेल, पाणीपत, कोसला अशा पूर्वीच्या पुस्तकांची मागणी ही तरुणांकडून होत आहे.

शिवाजी सावंत, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, बापू काळे, भालचंद्र नेमाडे आदी लेखकांची पुस्तके आजही तरुणांच्या पसंतीस उतरली आहेत. वाचनाच माध्यम जरी आधुनिक जीवनशैलीमुळे बदलत आहे. तरीही वाचनसंस्कृती आजही कायम असल्याचे दिसत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)