“इलेक्‍ट्रीकल वाहन’ उद्योगांसाठी लघु उद्योगांना तयार करावे

पिंपरी – वाढत्या पेट्रोल-डिझेल दरामुळे सरकार येत्या काळात इलेक्‍ट्रिक वाहन निर्मितीवर भर देणार आहे. या नवीन बदलांमध्ये पिपंरी-चिंचवडच्या लघु उद्योगांना प्रशिक्षण आणि वेगवेगळ्या योजनांद्वारे इलेक्‍ट्रिक वाहन उद्योगासाठी तयार करावे, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

असोसिएशनच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार पिंपरी-चिंचवड ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखले जाते. कित्येक लघु उद्योग बड्या ऑटोमोबाईल कंपन्यांना सुटे पार्टसचा पुरवठा करतात. इलेक्‍ट्रिक वाहन उद्योगात बाहेरच्या कंपन्यांनी प्रवेश केल्यास स्थानिक लघु उद्योगांवर परिणाम होईल. यामुळे उद्योगनगरीतील कित्येकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्‍यता आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्यांचे चारचाकी वाहन घेण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. यामुळे पेट्रोल आणि डिझेल वाहन उद्योगात मंदी येऊ शकते. मोठ्या कंपन्यांना सुटे पार्ट विकणाऱ्या लघु उद्योगांवर याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. यामुळे छोटे उद्योग बंद पडतील, अनेक कामगार व उद्योजक बेरोजगार होतील. उद्योजकांनी बॅंकांकडून घेतलेली कर्जे थकीत राहण्याची शक्‍यता आहे. एकूणच उद्योगनगरीवर होणाऱ्या मोठ्या दुष्परिणामांची शक्‍यता पाहून सरकारने आधीच पावले उचलावीत, अशी माणगी असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारने इलेक्‍ट्रिकल उद्योगात उतरण्यासाठी उद्योजकांकरता काही योजना आखाव्यात, कर माफ करावे, स्मॉल स्केल असोसिएशनतर्फे लवकरच याबाबत जिल्हा उद्योग केंद्र व पालकमंत्री यांच्यावर चर्चासत्र आयोजित केले जाईल तसेच मेक इन इंडियाच्या अनुशंगाने इलेक्‍ट्रिकल उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्‍यक गोष्टी उदारणार्थ स्पेअरपार्ट, यंत्रे, तसेच यासाठी लागणारे तंत्रज्ञान मार्गदर्शन मेळावा व प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)