इराण बनला भारताला कच्चे तेल पुरवणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश

तेहरान (इराण) – भारताला कच्चे तेल पुरवणारा इराण हा दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. सात वर्षांनतर इराणने पुन्हा एकदा आपले दुसऱ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले आहे.

एकीकडे अमेरिका इराणवर अनेक प्रकारचे निर्बंध घालत आहे, तर तेल निर्यातीबाबत इराण अनेक आकर्षक योजना सादर करत आहे. आणि अशा योजनांचा भारतीय कंपन्या पुरेपूर फायदा घेत आहेत. अमेरिकेने इराणवर घातलेले निर्बंध नोव्हेंबर महिन्यापासून प्रभावी होत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत्‌ भारतीय तेल कंपन्यांनी सौदी अरबपेक्षाही इराणकडून अधिक कच्चे तेल आयात केल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत दिली. त्यामुळे भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये सौदी अरब तिसऱ्या स्थानावर गेला आहे.

इराणकडून भारताने 56.70 लाख टन कच्चे तेल आयात केले. भारताने इराणकडील कच्च्या तेलाची आयात पूर्णपणे बंद करावी यासाठी अमेरिकेचा भारतावर दबाव वाढता आहे. मात्र त्यासाठी पुरेसा वेळ असल्याचे इंड्‌स्ट्रीचे म्हणणे आहे. डेडलाईनपूर्वी इराणकडील आयात कमी करून दुसरे स्रोत शोधता येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)