इराणकडे आहे गुप्त अणुगोदाम – इस्त्रायलचा आरोप

संयुक्तराष्ट्रे – जागतिक नेत्यांशी निशस्त्रीकरणाचा करार करूनही इराणने आपल्या राजधानीच्या शहराजवळच एक गुप्त अणुगोदाम केले आहे असा जाहीर आरोप इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतानयाहू यांनी केला आहे. संयुक्तराष्ट्रांच्या आमसभेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. त्यांनी या सभेत इराणचे हे गुप्त अणुगोदाम नेमके कोठे आहे याचा नकाशासह तपशील सादर केला. त्यामुळे खळबळ माजली असली तरी इराणने मात्र याचा इन्कार केला आहे. नेतानयाहु यांचा हा आरोप हास्यास्पद आहे आणि तो केवळ त्यांचा भ्रम आहे असे इराणने म्हटले आहे.

जागतिक नेत्यांशी निशस्त्रीकरणाचा करार करण्यापुर्वीच त्यांनी तेहरान जवळ ही सारी अण्विक सामग्री लपवली असून त्यांना ती कोणत्याहीं क्षणी वापरता येईल अशी त्याची सिद्धता त्यांनी ठेवली आहे. आमच्या गुप्तचर संघटनेने त्याचे सारे पुरावेही गोळा केले आहेत असे त्यांनी म्हटले आहे. तेहरान जवळील शौराबाद जवळ त्यांचे हे गोदाम असल्याचे त्यांनी सांगितले. इराणला असे गुप्त अणु गोदाम ठेवण्याचे कारण काय यावर सर्वांनीच विचार केला पाहिजे असे आवाहनही नेतानयाहु यांनी जागतिक समुदायाला केले. इराणने कितीही लपवाछपवी केली तरी आम्ही ती उघडीपाडू असे ते म्हणाले. या गोदामातील अण्विक सामग्री ही प्रचंड प्रमाणात असून आम्ही जगातील साऱ्या अण्विक संस्थांना याविषयीची माहिती आणि पुरावे सादर केले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इराणशी करण्यात आलेल्या अण्विक करारातील फोलपणा लक्षात आल्यानंतर अमेरिका त्यातून बाहेर पडली आणि त्यांनी इराणवर पुन्हा नव्याने निर्बंध लागू केले आहेत. ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय प्रशंसनीय आहे असेही त्यांनी म्हटले आहे. इराणला अणुशक्ती होऊ देता कामा नये असे आवाहन करताना त्यांनी जागतिक समुदायाला आवाहन केले की त्यांच्यावर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांना साऱ्या जगाने पाठिंबा दिला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)