इराकमध्ये भूकंपाचा तीव्र धक्का

तेहरान: इराणमध्ये आज भूकंपाचा तीव्र धक्का बसला. इराकच्या सीमेलगत झालेल्या या भूकंपाची तीव्रता 6.0 रिश्‍टर इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू केमानशहा प्रांताततील जावनरुद शहराच्या अग्नेयेला 20 किलोमीटरवर होता असे अमेरिकेच्या भूगर्भ संशोधन संस्थेने म्हटले आहे. याच भागामध्ये गेल्यावर्षी झालेल्या भीषण भूकंपामध्ये 620 जण मरण पावले होते. आज झालेल्या भूकंपामध्ये दोघे जण मरण पावले तर 241 जण जखमी झाले आहेत. त्यामधील 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे, असे केमानशाह युनिर्व्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसचे आपत्कालिन विभागाचे प्रमुख सायेब शारीदारी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. भूकंपाच्या मुख्य धक्‍क्‍यानंतर किमान 21 आफ्टर शॉक बसल्याचेही त्यांनी सांगितले. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)