इराकच्या मोसुल मधील ऐतिहासिक मशिदीची पुन्हा होणार उभारणी

बगदाद – इस्लामिक स्टेटच्या गनिमांनी मांडलेल्या उच्छादाच्यावेळी गेल्या वर्षी इराकच्या मोसुल प्रांतातील अल नुरी या ऐतिहासिक मशिदीची मोठीच पडझड झाली होती. तेथील मिनारलाही मोठी हानी पोहचली होती. पण संयुक्त अरब अमीरातीच्या मदतीने इराकने या मशिदीच्या फेरउभारणीचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी सुमारे 51 दशलक्ष डॉलर्स इतका खर्च येणार आहे. या कामाला प्रारंभ झाला असून ते काम पाच वर्ष चालणार आहे.

या विषयीच्या करारावर नुकत्याच इराकी व युएईच्या प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या केल्या. युनेस्कोचे इराक मधील प्रतिनिधी लुईस हॅक्‍सथौसेन हेही यावेळी उपस्थित होते. ही मशिद बाराव्या शतकातील आहे. ती जून 2017 मध्ये, उद्धवस्त झाली होती. इसिसच्या जिहादींनीच ही मशिद स्फोटकांच्या सहायाने उडवून दिली होती. याच मशिदीत इसिसचा प्रमुख अबु बक्र अल बगदादी याने लोकांना पहिल्यांदाच सन 2014 मध्ये जाहीर दर्शन दिले होते. आखाती देशातील ही एक महत्वाची मशिद आहे. तो जागतिक वारसा म्हणूनही ओळखली जाते. नुरेद्दीन अल झिंकी यांनी सन 1172 मध्ये या मशिदीची उभारणी केली होती. या मशिदीच्या उभारणीचे काम युनेस्कोच्या देखरेखेखाली होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)