इरफान खानच्या “डूब’ची ऑस्करसाठी बांगलादेशकडून एन्ट्री

इरफान खानचा लीड रोल असलेल्या “डूब’ या सिनेमाला बांगलादेशकडून ऑस्करसाठी अधिकृत एन्ट्री मिळाली आहे. फॉरेन लॅन्ग्वेज कॅटेगरीमध्ये “डूब’ला ही एन्ट्री दिली गेली आहे. “डूब- नो बेड फॉर रोजेस’ ची निर्मिती भारत आणि बांगलादेश दोन्ही देशांच्या संयुक्‍त प्रयत्नांमधून करण्यात आली आहे. रिमा दासचा सिनेमा “व्हिलेज रॉकस्टार’बरोबर “डूब’चा सामना होणार आहे.

“डूब’गेल्या दोन वर्षांपूर्वीपासून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झळकतो आहे. 25 जून 2017 रोजी शांघाय इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याचा प्रिमिअर झाला आहे. याशिवाय किमान 15 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंमधून तो दाखवण्यात आला आहे. मुस्तफा सरवर फारुखी या बांगलादेशी दिग्दर्शकाने या सिनेमाचे डायरेक्‍शन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिनेमाला जरी आता ऑस्करवारीसाठी उतरवले गेले असले, तरी या सिनेमाचा प्राथमिक प्रवास खूपच खडतर होता. 16 फेऱ्ब्रुवारी 2017 रोजी या सिनेमाचे “नो ऑब्जेक्‍शन’ प्रमाणपत्र रोखून धरण्यात आले होते. या सिनेमातील काही भाग आपल्या पतीच्या जीवनाशी मिळता जुळता आहे, असा दावा प्रसिद्ध लेखक हुमायूं अहमद यांच्या पत्नी मेहेरा अफरोझ यांनी केला होता. त्यामुळे सिनेमाच्या भविष्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. “नो ऑब्जेक्‍शन’ सर्टिफिकेट मिळण्यासाठी सिनेमाला खूप वाट बघायला लागली होती. शांघाय फिल्म फेस्टिव्हलनंतर तब्बल 5 महिन्यांनी म्हणजे ऑक्‍टोबर 2017 मध्ये हा सिनेमा भारत आणि बांगलादेशात रिलीज होऊ शकला होता.

“डूब’ची गोष्ट एका सिने निर्मात्याची गोष्ट आहे. आयुष्यभर चित्रपट निर्मितीच्या कामात राहिल्यानंतर वयाच्या एका वळणावर असताना आलेले एकटेपण घालवायचे कसे, असा प्रश्‍न या निर्मात्यासमोर आलेला असतो. त्याने एकटेपण घालवण्यासाठी केलेल्या उद्योगातून तो अधिकच वादात अडकतो. त्याच्याच मुलीच्या लहानपणच्या मैत्रिणीबरोबर त्याचे अफेअर होते, अशी कथा आहे. इरफान खान, नुसरत इमरोझ तिशा, पर्णो मित्रा आणि रोकेया प्राच्य असे प्रमुख कलाकार असलेल्या “डूब’च्या निमित्ताने भारतीय इरफान खानला ऑस्करची
संधी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)