इम्रान खान 11 ऑगस्टला घेणार शपथ

पेशावर – आपण पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची 11 ऑगस्टला शपथ घेणार आहोत अशी माहिती इम्रान खान यांनी दिली आहे. तहरीक ए इन्साफ या पक्षाचे प्रमुख असलेले इम्रान खान यांचा पक्ष नॅशनल ऍसेम्ब्लीत सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला असला तरी त्यांच्याकडे बहुमताएवढे संख्याबळ नाही.

तथापी आम्ही अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करू आणि 11 ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेऊ असे इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे. येत्या 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे. त्याच्या आधी इम्रान खान हे पंतप्रधानपदाची शपथ घेतील अशी माहिती पक्षाच्या वतीने आधी देण्यात आली होती. तहरीक एक इन्साफ या पक्षाने एकूण 116 जागा मिळवल्या असून त्यांना बहुमतासाठी अजून 22 जागांची आवश्‍यकता आहे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)