इम्रान खान यांच्या सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील तेहरीक ए इन्साफ ही पार्टी सर्वाधिक 115 जागा मिळवणारी पार्टी ठरल्यानंतर त्यांनी आता बहुमत प्राप्त करण्यासाठी आणि सरकार स्थापनेसाठी अन्य पक्षांच्या नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. 270 पैकी 267 जागांचे निकाल आत्ता पर्यंत जाहीर झाले आहेत. त्यात इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला 115 जागा मिळाल्या आहेत.

पाकिस्तानच्या नॅशनल ऍसेम्ब्लीची एकूण सदस्य संख्या 342 आहेत. त्यापैकी 272 सदस्य निवडणुकांद्वारे थेट निवडले जातात. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी एकूण 172 जागांचे पाठबळ आवश्‍यक आहे. नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाला 64 तर असिफअली झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला 43 जागा मिळाल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तेरा अपक्ष उमेदवार थेट निवडून आले आहेत. इम्रान खान यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांशी काल आणि आज सलग सल्लामसलत केली. त्यांनी अपक्ष संसद सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी खान तरीन यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. त्यांनी स्वत: मुत्तहिदा कौमी मुव्हमेंटचे प्रमुख खलिद मकबुल यांच्याशी चर्चा केली.

दरम्यान खैबर पख्तुनवा प्रांतात पाकिस्तान तहरीक ए इन्साफ या पक्षाला बहुमत मिळाले असून तेथील नेता निवडीबाबतही त्यांनी आपल्या पक्ष सहकार्यांशी चर्चा केली.तेथे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा परवेझ खट्टक यांचीच निवड होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. बलुचिस्तान प्रांतातही त्यांच्या पक्षाला अन्य पक्षांची मदत घेऊन सरकार चालवावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)