इम्रानखान यांनी धाडसी पावले टाकावीत…

माजी क्रिकेटपटू अझहरूद्दीन यांची अपेक्षा
हैदराबाद – पकिस्तानात सत्तेवर येणारे माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी आपल्या देशाच्या संबंधात धाडसी निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा भारताचे माजी क्रिकेट कर्णधार आणि कॉंग्रेसचे माजी खासदार अझहरूद्दीन यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की पाकिस्तानच्या कर्णधारपदी काम करताना इम्रानखान यांनी ज्या धाडसाने काही निर्णय घेतले तसेच निर्णय त्यांनी त्यांच्या देशाचा कारभार सांभाळताना घेतले पाहिजेत.

तीन दशकांपुर्वी जेव्हा इम्रान खान हे क्रिकेट खेळत होत त्याच वेळी अझहरूद्दीनही भारताकडून खेळत होते व त्यांनी त्यांच्या भेदक गोलंदाजीचाही सामना केला आहे. पाकिस्तानचा कारभार पाहणे ही सोपी गोष्ट नाहीं. त्यासाठी इम्रानखान यांना बरेच धाडस दाखवावे लागेल असे मत त्यांनी व्यक्‍त केले आहे. पाक क्रिकेट टीमचा कर्णधार म्हणून त्यांनी चांगली कामगीरी केली. अनेक विधायक निर्णय त्यांनी त्यावेळी आपल्या देशासाठी घेतले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे ते आता पंतप्रधान म्हणून काय कामगिरी बजावतात हे पहाणे महत्वाचे आहे. इम्रानखान यांच्या निवडीमुळे दोन्ही देशांतील तणाव कमी होईल असे आपल्याला वाटते काय असे विचारता अझहरूद्दीन म्हणाले की दोन्हीं देशांतील संबंध सुधारावेत अशी आपलीही इच्छा आहे. पाकिस्तानात अनेक समस्या आहेत. या समस्या सोडवण्यावर त्यांना आधी भर द्यावा लागेल. त्यानंतरच ते अन्य समस्या सोडवू शकतात.

प्रथम आपण काही चांगले घडवू शकतो असा विश्‍वास त्यांनी दाखवून दिला तर त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी भारताकडूनही पुढाकार घेतला जाऊ शकतो असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)