इन्सुलिन: डायबेटीस नियंत्रणाची संजीवनी 

डॉ प्रविशाल अडलिंग, (मधुमेह सल्लागार) 

भारत हा जगातील सर्वात मोठ डायबेटीस असलेल्या लोकांचा देश असून येथे डायबेटीस चे उपचार करण्यामध्ये बऱ्याच अडचणी येताना दिसून येतात. ज्यात सर्वात महत्वाची अडचण म्हणजे इन्सुलिन च्या वापरा बद्दल लोकांच्या मनात असलेली भीती होय.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डायबेटीस चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि भारतीय वैद्यकीय क्षेत्रावर याचा खूप ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे डायबेटीस बद्दल जागृती करून त्याचे योग्य ते व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. डायबेटीस होण्यामागचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मानवाच्या शरीरातील एका महत्वाच्या संयत्राचा ऱ्हास होणे ते संयत्र म्हणजे इन्सुलिन होय. टाइप 2 मधुमेह असलेल्या बर्याच लोकांसाठी स्वयं-व्यवस्थापन इंजेक्‍शन्स धडकी भरणारी असते ही चिंता मानसिक समुपदेशन द्वारे कमी केली जाऊ शकते.

जवळपास सर्वच डायबेटिक रुग्ण इन्सुलिन बद्दल विचित्रपणे वागतात त्यामुळे डायबेटीसची समस्या अधिकच त्रासदायक बनते. रुग्णाच्या मनात इन्सुलिन बद्दल अतिशय नकारात्मक बाबी घर करून आहेत त्यामुळे बरेचदा रुग्ण इन्सुलिन थेरपी घेण्यास धजावत नाही.

इन्सुलिनबद्दल रुग्णांमध्ये अनेक गैरसमज आहेत. याचे कारण त्यांनी इन्सुलिन बद्दल खूप नकारात्मक गोष्टी ऐकल्या असतात. शरीरात इन्सुलिन चे प्रमाण कमी झाले की डायबेटीस होतो व हे कमी झालेले प्रमाण इन्सुलिन थेरपीच्या मदतीने भरून काढले जाते त्यामुळे ही प्रक्रिया अतिशय सुरक्षित आहे. इन्सुलिन थेरपीचे सर्वात मोठे भय सुईचे असते परंतु इन्सुलिन साठी वापरल्या जाणाऱ्या सुया तुलनेत अतिशय पातळ असतात व त्या स्नायू मध्ये न देता फॅट मध्ये दिल्या जातात त्यामुळे त्या दुखत नाहीत.

आजकाल इन्सुलिन पंप व फायबर नीडल सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागला आहे त्यामुळे वारंवार शरीरात सुया टोचाव्या लागत नाहीत व रुग्णासाठी ही प्रक्रिया सुसह्य होते. इन्सुलिन थेरपी वापरताना डायबेटोलॉजीस्टने रुग्णास मानसिकरित्या आधार द्यायला हवा. तज्ञ डॉक्‍टरांची टीम इन्सुलिन वापरा आधी रुग्णास याबद्दल शिक्षित करतात त्यामुळे त्यांची भीती कायमची नाहीसी होते. अनेक संशोधनातून असे लक्षात आले आहे की इन्सुलिनचा योग्य व वेळेत केलेला वापर डायबेटीस नियंत्रणात महत्वाची भूमिका बजावते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)