“इन्कम टॅक्‍स’ भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत

नवी दिल्ली – प्राप्तीकर विवरण दाखल करण्याला सरकारने 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 2018-19 या आर्थिक मूल्यांकन वर्षासाठी प्राप्तीकर भरण्यासाठी एक महिन्याभरापेक्षा अधिक काळाची मुदत वाढवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नवीन प्राप्तीकर विवरण अर्ज एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला अधिसूचित करण्यात आले आणि जे करदाते लेखा परिक्षण करण्यास बांधील नाहीत त्यांना इंटरनेटच्या माध्यमातून 31 ऑगस्टपर्यंत प्राप्तीकर विवरण दाखल करता येऊ शकेल.

करदात्यांच्या श्रेणींमधून आलेल्या मुदतवाढीच्या प्रस्तावावर विचार विनिमय करून केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने विवरणपत्रे दाखल करण्याची मुदत 31 जुलै ऐवजी 31 ऑगस्ट 2018 पर्यंत वाढवली आहे. असे अर्थमंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)