इनामगावात पकडला पाच फुटांचा नाग

मांडवगण फराटा -इनामगाव गांधलेमळा (ता. शिरूर) येथील शेतकरी विजय दादासाहेब लोणकर यांच्या घराजवळ ठेवलेल्या सरपणात दुपारी एकच्या सुमारास पक्ष्यांचा किलबिलाट होऊ लागल्याने घरातील सदस्यांनी घराबाहेर जाऊन पाहिले असता मोठा साप आढळून आला. तांदळी येथील सर्पमित्र व सर्पजीवन संस्था दौंडचे सदस्य सुनिल कळसकर व नवनाथ कळसकर यांनी त्या गांधलेमळा या ठिकाणी जाऊन काही क्षणांतच सापाला सुखरुप पकडले. सर्पमित्राच्या या तत्पर सेवेमुळेच एका सापाला जीवदान मिळाले. पकडलेला साप हा अतिविषारी नाग असून त्याची लांबी 5 फूट व रंग गर्द तपकिरी आहे. महाराष्ट्रात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी जातीपैकी हा एक आहे. त्याला सर्पमित्राच्या साहाय्याने निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले. यावेळी सर्पमित्र शरद गदादे, विक्रम शिंदे, गोविंद शेलार, मनोज चौधरी, अमोल पाटोळे, गणेश अहिवळे, कमलेश गुंजाळ, बापुराव लोणकर, राजेंद्र लोणकर उपस्थित होते.
इनामगाव गांधलेमळा (ता. शिरूर) : येथील शेतकरी विजय दादासाहेब लोणकर यांच्या घराजवळ नाग पकडला.

Leave A Reply

Your email address will not be published.