लखनऊ : उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या शाळेच्या बसला झालेल्या भीषण अपघातात काही प्रमाणात गाडी चालकाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. शाळेच्या बसचालकाने कानात इअर फोन लावल्याने त्याला ट्रेनचा आवाज ऐकू आला नाही, त्यामुळे हा भयंकर अपघात झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
आज सकाळी ही भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.
दरम्यान, समोरून ट्रेन येत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. पण कानात इअर फोन असल्याने वाहनचालकाला त्यांचा आवाज ऐकायला आला नाही. त्यामुळे हा अपघात झाल्याचं स्थानिकांनी सांगितले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा