इंधन म्हणून अमोनियम नायट्रेट वापरले, तर प्रदूषण संपेल…

पदार्थविज्ञान संशोधक श्रीनिवास शारंगपाणी यांचा दावा 

पुणे – वाहनांमधील कार्बन उत्सर्जनामुळे होणारे प्रदुषण ही एक चिंतेची बाब बनली आहे. या कार्बन उत्सर्जनामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. परंतु या इंजिनमधील इंधनाच्या वापरातून कार्बनऐवजी ऑक्‍सिजन, नायट्रोजन आणि पाण्याची वाफ बाहेर पडली तर? हे शक्‍य आहे, अमोनियम नायट्रेटचा इंधन म्हणून वापर झाला, तर प्रदूषणाची भीषण समस्या कायमस्वरूपी नष्ट होईल, असा दावा पदार्थविज्ञान संशोधक श्रीनिवास शारंगपाणी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

याबद्दलचा प्रबंध इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ सायंटिफिक रिसर्च या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्येदेखील प्रसिद्ध झाला आहे. टाटा समूहामध्ये बरीच वर्षे संशोधन आणि विकास विभागात काम केलेले शारंगपाणी निवृत्तीनंतर विविध विषयांवर संशोधन करत आहेत. वाढत्या प्रदूषणाची समस्या विशेषत: विमाने, वाहनांतून निघणाऱ्या धुरामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषण आणि आरोग्याच्या समस्यांमुळे व्यथित झालेल्या सारंगपाणी यांनी पर्यावरणपूरक संयंत्र बनविण्याचा ध्यास घेतला. गेली बारा वर्षे त्यांचे याविषयावर संशोधन सुरू होते.

याबाबत शारंगपाणी म्हणाले, “हे संयंत्र यांत्रिक ऊर्जा निर्माण करेल आणि उप-उत्पादन म्हणून प्राणवायू, नायट्रोजन आणि पाण्याची वाफ बाहेर टाकेल. कार्बन-डाय-ऑक्‍साईड आणि नायट्रोजन-डाय-ऑक्‍साईडसारखे हानिकारक वायू बाहेर पडणार नसल्यामुळे प्रदुषण आणि तापमानवाढीसारख्या समस्यांपासून मोठा आराम मिळेल.’

सद्यस्थितीत ही संकल्पना व्यावसायिक स्वरूपात अंमलात आणण्यासाठी मोठा खर्च लागणार आहे. यासाठी उद्योजक, शासन आनि संशोधन संस्था यांनी पुढाकार घेऊन गुंतवणूक करावी, यामुळे भविष्यात केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील प्रदूषणाची समस्या सोडविण्यासाठी हा एक महत्वपूर्ण शोध ठरेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी इस्रोचे माजी संचालक डॉ. सुरेश नाईक, सायन्स ऍन्ड टेक्‍नॉलॉजी पार्कचे संचालक रविंद्र जगदाळे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)