इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा

  • राज्यासह केंद्र सरकारच्याविरोधात दिल्या घोषणा

पिरंगुट – दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केल्याच्या निषेधार्थ मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पंचायत समिती कार्यालय ते तहसील कचेरी असा मोर्चा काढला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणा देऊन यास तीव्र विरोध असल्याचे दाखविले.
यावेळी यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक रामभाऊ ठोंबरे, माजी सभापती महादेव कोंढरे, सभापती कोमल साखरे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, माजी सभापती कोमल वाशिवले, तालुका अध्यक्ष सुनील चांदेरे, माजी सभापती उज्वला पिंगळे, रूपाली ढोकळे, युवक अध्यक्ष अमित कंधारे, सुनील वाडकर, साखर कारखाना संचालक लक्ष्मण भरेकर, धैर्यशील ढमाले, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष जितेंद्र इंगवले, विद्यार्थी अध्यक्ष निखिल मारणे, सतीश सुतार, माऊली कांबळे, माऊली कुडले, नवनाथ चरवड, सागर घुमाळ, सुखदेव चांदेरे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सुनील चांदेरे म्हणाले, पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने सामांन्य माणसाचे फिरणे आणि जगणे मुश्‍कील झाले आहे. केंद्र सरकारने इंधनाच्या किंमतीत भरमसाठ वाढ करून जनसामान्याच्या अडचणीत भर घातली आहे. जगामधील क्रुड तेलाच्या किंमती जास्त असताना कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने पेट्रोल, डिझलचे दर कमी ठेवले होते. परंतु आज जगामधील क्रुड तेलाच्या किंमती कमी होऊनही पेट्रोल, डिझेलच्या किंमती मोदी सरकारने प्रचंड वाढवून आपली अकार्यक्षमता दाखवून दिलेली आहे. सामान्य जनतेच्या कररूपी पैशाने स्वत:च्या जाहिराती करून परत सत्तेत येण्याच्या भाजप प्रयत्न निषेधार्थ आहे.
त्यानंतर रामभाऊ ठोंबरे म्हणाले, एकीकडे इंधनाचे दर वाढवले तर दूसरीकडे दूधाचे भाव प्रचंड कमी करून सरकारने दूध धंदा अडचणीत आणलेला आहे. शेतकऱ्यांचे जगणे आज कठीण झाले आहे.
यावेळी महादेव कोंढरे, अनिल मोरे, जितेंद्र कोळेकर, कोमल वाशिवले यांचीही यावेळी भाषणे झाली. रामदास पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. जितेंद्र इंगवले यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)