इंधन दरवाढीविरुद्ध राष्ट्रवादीचे जनआक्रोश आंदोलन

भोर- केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दैनंदीन दरवाढीने सर्वसामान्य माणसाचे आर्थिक बजेट कोलमडले असून, महागाईने उच्चांक गाठला आहे. या सरकारने त्यांच्या कार्यकाळात दिलेले एकही अश्वासन पाळले नसून जनतेची घोर निराशा केली आहे.
क्रुड ऑईलचे दर निम्म्याने कमी होऊनही सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करण्याऐवजी वाढ चालूच ठेवली असून पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. सरकारने हे वाढलेले पेट्रोल-डिझेलच दर त्वरीत कमी करावेत, अन्यथा यापुढे आणखी तीव्र स्वरूपाची आंदोलने केली जातील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
या विषयाच्या अनुषंगाने भोर तालुका आणि शहर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने भोरच्या तहसीलदार वर्षा शिंगण पाटील यांना राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाठे, राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष गणेश खुटवड, भोर शहर अध्यक्ष नितीन धारणे, उपसभापती विक्रम खुटवड यांच्या हस्ते लेखी निवेदन देण्यात आले. या जनआक्रोश आंदोलनात केतन चव्हाण, प्रकाश तनपुरे, जाधव, यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)